Pune : पुण्यातील अपघाताची मालिका थांबणार? नवले पुलाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

Pune Navale Bridge Accident Death News : पुण्यातील नवले पुलावर कंटेनर अनियंत्रित झाल्याने झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर महापालिका, एनएचएआय आणि पोलिसांनी तातडीची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या.
Pune : पुण्यातील अपघाताची मालिका थांबणार? नवले पुलाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
Pune NewsSaam Tv
Published On
Summary

नवले पुलावरील भीषण अपघातात ८ ठार, १५ जखमी

अपघातानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक

रम्बल स्ट्रिप्स, वेगमर्यादा, एलईडी बोर्ड, अवैध वाहतूक नियंत्रणासह अनेक उपाययोजना जाहीर

सहा महिन्यात चार सेवा रस्ते तयार करण्याचा निर्णय

पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी भीषण अपघात झाला. कंटेनर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने कंटेनर पुढे असलेल्या गाड्यांना धडकला. या भीषण अपघातानंतर एका गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. नवले पूल येथे झालेल्या भीषण अपघातानंतर पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्‍यांची समन्वयाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात घडला. या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा या पुलावरचा हा पहिलाच अपघात नसून यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत. या पुलावरील असलेल्या तीव्र उतारामुळे आणि मोठ्या अवजड वाहनांची सततच्या येण्याजाण्यामुळे हे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Pune : पुण्यातील अपघाताची मालिका थांबणार? नवले पुलाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
Shocking News : मुंबई हादरली! तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, जबरदस्ती लिंग परिवर्तन, तृतीयपंथींच्या टोळीचं भयंकर कृत्य

दरम्यान गुरुवारी घडलेला अपघात हा भीषण होता या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्‍यांची समन्वयाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पुन्हा एकदा दिर्घकालीन, मध्यमकालीन आणि अल्पकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आहे.यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर रम्बलर्स स्ट्रीप, कॅटआय लावण्यास उशीर होऊ नये यासाठी हे काम स्वतः महापालिकेने करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज सकाळी नवले पूल परिसरात पाहणी केली. त्यानंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune : पुण्यातील अपघाताची मालिका थांबणार? नवले पुलाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

अशा आहेत उपाययोजना

- महामार्गावर ५ मिमी, १० मिमी, १५ मिमीचे रम्बलर्स स्ट्रीप लावणे

- ठिकठिकाणी एलइडी बोर्ड लावणे

- अवजड वाहनांनी सक्तीने रस्त्याची बाजू वापरावी, त्यामुळे सर्व्हिस रस्त्यापासून ही वाहने लांब राहतील.

- नो पार्किंगच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणे

- कात्रज ते नवले पूल या दरम्यान वाहनांचा वेग ४० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचे बंधन

- भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे

- नवले पूल व परिसरातील अवैध वाहतुकीवर निर्बंध आणणे

- महामार्गावर थांबणाऱ्या प्रवासी गाड्यांवर कारवाई करणे

Pune : पुण्यातील अपघाताची मालिका थांबणार? नवले पुलाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
Accident News : नवस फेडायला गेले, पण परत आलेच नाहीत; तो गुरुवार ठरला शेवटचा, पुणे अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

सहा महिन्यात होणार 'हे' सेवा रस्ते

- सूस खिंड ते राधा हॉटेल

- डुक्कर खिंड ते मुठा नदी

- वडगाव पूल ते नवले पूल

- नवले पूल ते भुमकर पूल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com