

टेक कंपनी अॅपल आयफोनमध्ये अनेक स्मार्ट आणि लपलेली फीचर्स देते. ज्यांचा वापर कधी कधी स्वतः यूजर्सनाही माहिती नसतो. ही सेटिंग्ज केवळ दैनंदिन टायपिंग आणि फोन नेव्हिगेशन सोपे करत नाहीत, तर तुमचा संपूर्ण स्मार्टफोन अनुभव अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनवतात. खास बाब म्हणजे यासाठी कोणत्याही अतिरिक्त अॅपची गरज नाही. तुमचा आयफोन जास्तीत जास्त परिणामकारकतेने वापरायचा असेल, तर ही पाच सेटिंग्ज नक्की जाणून घ्या.
स्पेस बार ट्रिक
आयफोनवर टचस्क्रीनमध्ये कर्सर अचूक जागी ठेवताना अनेकांना अडचण येते. पण कीबोर्डमध्ये एक हुशार फीचर दिले आहे. फक्त स्पेस बार लांब दाबून ठेवा, आणि कीबोर्ड ट्रॅकपॅड मोडमध्ये बदलेल. त्यानंतर बोट हलवून तुम्ही कर्सरला इच्छित ठिकाणी सहज नेता येते. त्यामुळे टायपिंगमधील चुका दुरुस्त करणे झटपट आणि अधिक सोपे होते.
तुमचा फोन सायलंट न करता कीबोर्ड क्लिक सायलंट करा
कीबोर्डचा क्लिक आवाज त्रासदायक वाटत असेल, तर संपूर्ण आयफोन सायलेंट न करता तुम्ही तो वेगळा बंद करू शकता. यासाठी सेटिंग्ज- साउंड्स अँड हॅप्टिक्स- कीबोर्ड फीडबॅक येथे जाऊन ‘साउंड’ ऑफ करा. हॅप्टिक्स सुरू ठेवल्यास टाइप करताना हलका आवाज जाणवत राहील, त्यामुळे अनुभव आरामदायी आणि शांतच राहतो.
अॅपल लोगोला शॉर्टकट बटण बनवा
आयफोनच्या मागील बाजूवरील Apple लोगो फक्त शोभेकरिता नाही—तो एक लपलेले बटण म्हणूनही काम करतो. ‘बॅक टॅप’ फीचर वापरून तुम्ही स्क्रीनशॉट, कॅमेरा किंवा कंट्रोल सेंटरसारख्या शॉर्टकट्स डबल किंवा ट्रिपल टॅपने उघडू शकता. यासाठी सेटिंग्ज > Accessibility > Touch > Back Tap येथे जाऊन हवे ते फंक्शन निवडा.
टॉर्चची चमक नियंत्रित करा
अनेक लोक आयफोनची फ्लॅशलाइट फक्त ऑन–ऑफ करण्यासाठी वापरतात, पण तिची ब्राइटनेस लेव्हलही बदलता येते हे अनेकांना ठाऊक नसते. कंट्रोल सेंटरमध्ये फ्लॅशलाइट आयकॉनला लांब दाबा, आणि ब्राइटनेस समायोजित करण्यासाठी स्लायडर दिसेल. कमी प्रकाशात वाचण्यासाठी किंवा जास्त प्रकाश हवा असल्यास हे फीचर अतिशय उपयुक्त ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.