Lava Bold N1 5G: कमी पैशात हाय-टेक फोन! 5000mAh बॅटरी, मोठी स्क्रीन आणि जबरदस्त फीचर्स, किंमत किती?

Budget 5G Phone: Lava Bold N1 5G हा उत्तम पर्याय ठरू शकतो. परवडणाऱ्या किमतीत दमदार फीचर्स आणि ५जी परफॉर्मन्स देणारा हा फोन बजेट युजर्ससाठी खास आहे.
Lava Bold N1 5G: कमी पैशात हाय-टेक फोन! 5000mAh बॅटरी, मोठी स्क्रीन आणि जबरदस्त फीचर्स, किंमत किती?
Published On

कमी बजेटमध्ये ५जी फोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी लावा कंपनीने आकर्षक पर्याय बाजारात आणला आहे. लावा बोल्ड एन१ ५जी हा फोन अशा ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आला आहे जे कमी किमतीमध्ये ५जी सपोर्ट असलेले स्मार्टफोन शोधत आहेत. या फोनमध्ये फक्त ५जी कनेक्टिव्हिटीच नाही, तर इतर अनेक उपयुक्त फीचर्स देखील दिले आहेत.

लावा बोल्ड एन१ ५जी हा भारतात दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. अमेझॉनवर हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी ६९९९ रुपयांना विकला जात आहे. जर ग्राहकांना अधिक स्टोरेजची गरज असेल, तर ते ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फक्त ७,४९९ रुपयांना खरेदी करू शकतात. म्हणजेच, फक्त ५०० रुपयांच्या फरकात दुप्पट स्टोरेजचा फायदा मिळतो.

Lava Bold N1 5G: कमी पैशात हाय-टेक फोन! 5000mAh बॅटरी, मोठी स्क्रीन आणि जबरदस्त फीचर्स, किंमत किती?
ChatGPT Go Plan: ₹4,788 किमतीचा ChatGPT Go प्लॅन आता पूर्णपणे मोफत, सबस्क्रिप्शन कसे क्लेम कराल?

Flipkart वर सुद्धा हा फोन उपलब्ध आहे. मात्र तिथे किंमत थोडी जास्त आहे. Flipkart वर ६४ जीबी व्हेरिएंट ₹८,४७४ आणि १२८ जीबी व्हेरिएंट ₹८,९९९ मध्ये विकला जात आहे. त्यामुळे हा फोन Amazon वर सर्वात स्वस्त दरात मिळू शकतो.

Lava Bold N1 5G: कमी पैशात हाय-टेक फोन! 5000mAh बॅटरी, मोठी स्क्रीन आणि जबरदस्त फीचर्स, किंमत किती?
Whatsapp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचा नवा धमाका! DP ला ठेवता येणार कव्हर फोटो, काय आहे नवीन फीचर?

या किंमत श्रेणीत लावा बोल्ड एन१ ५जी फोन Samsung Galaxy F06 5G आणि Poco C75 5G सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी थेट स्पर्धा करणार आहे. लावा कंपनीने यापूर्वीही भारतीय बाजारात बजेट-फ्रेंडली आणि स्थानिक गरजांसाठी स्मार्टफोन्स सादर केले आहेत. बोल्ड एन१ ५जी हा त्याच परंपरेचा पुढचा टप्पा असून, कमी किंमत आणि उत्तम वैशिष्ट्ये असणारा या फोनला आकर्षक बनवतो.

लावा बोल्ड N1 5G स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: या ५जी स्मार्टफोनमध्ये ६.७५ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले असून, ९०Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रीन अनुभव अधिक स्मूद मिळतो.

चिपसेट: या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल Unisoc T765 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आला आहे, जो दैनंदिन वापरासाठी स्मूद आणि जलद परफॉर्मन्स प्रदान करतो.

रॅम आणि स्टोरेज: या फोनमध्ये ४ जीबी व्हर्च्युअल रॅमचा पर्याय उपलब्ध असून, एकूण रॅम क्षमता ८ जीबीपर्यंत वाढवता येते, ज्यामुळे मल्टीटास्किंग सोपे होते.

कॅमेरा: या डिव्हाइसमध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे, तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, ओटीजी सपोर्ट आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे वापर अनुभव अधिक सुकर होतो.

बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी १८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि दीर्घकाळाचा वापर सुनिश्चित करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com