यूजर्सचा अनुभव अधिक आकर्षक आणि वैयक्तिक बनवण्यासाठी WhatsApp सतत नवीन फीचर्स आणत असतो. आता कंपनी आणखी एक नवीन फीचर सादर करण्याच्या तयारीत आहे. जे आधी फक्त WhatsApp बिझनेस अकाउंटसाठी उपलब्ध होते. या नवीन फीचरचे नाव ‘कव्हर फोटो’ असून, फेसबुकप्रमाणेच यूजर्स त्यांच्या DP व्यतिरिक्त प्रोफाइलवर कव्हर फोटोही लावू शकतील. हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजवर आहे आणि लवकरच सर्वसामान्य यूजर्ससाठी उपलब्ध होईल.
WABetaInfo या व्हॉट्सअॅप अपडेट्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइटनुसार, लवकरच सामान्य व्हॉट्सअॅप यूजर्स त्यांच्या प्रोफाइलवर कव्हर फोटो अपलोड आणि सेट करू शकतील. यूजर्स त्यांच्या फोनच्या गॅलरीमधून एखादा फोटो निवडून तो थेट प्रोफाइलवर कव्हर फोटो म्हणून वापरू शकतील. फेसबुकसारखेच, हा कव्हर फोटो तुमच्या प्रोफाइलच्या वरच्या भागात दिसेल, ज्यामुळे प्रोफाइलचा लूक अधिक सुंदर आणि आकर्षक बनेल.
WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हे नवीन फीचर कसे दिसेल आणि यूजर्सना ते कुठे सापडेल हे दाखवले आहे. विशेष म्हणजे, WhatsApp या फीचरसोबत प्रायव्हसीसाठी नवीन सेटिंग्जही देणार आहे. यूजर्स ठरवू शकतील की त्यांचा कव्हर फोटो कोण पाहू शकेल आणि कोण नाही. यात तीन पर्याय असतील. “Everyone”, “My contacts” आणि “Nobody”.
जर यूजर्सने “Everyone” हा पर्याय निवडला, तर त्यांचा कव्हर फोटो सर्व WhatsApp यूजर्सना दिसेल. अगदी त्यांच्या संपर्क यादीत नसलेल्यांनाही दिसेल. “My contacts” निवडल्यास फक्त मित्र आणि ओळखीचे लोकच फोटो पाहू शकतील. तर “Nobody” या सेटिंगमुळे कव्हर फोटो इतर कोणालाही दिसणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.