रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओ स्वस्त आणि आकर्षक रिचार्ज प्लॅनसाठी ओळखले जाते. कंपनी नेहमीच ग्राहकांना कमी किंमतीत उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करते. आता जिओने आपल्या प्लॅनच्या यादीत काही खास पर्याय समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे लाखो यूजर्सना दीर्घकालीन रिचार्जची चिंता न करता सोयीस्कर सेवा मिळू शकणार आहे.
३६५ दिवस चालणारे विविध जिओ रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध
जिओकडे तब्बल ५०० दशलक्षांचा मजबूत ग्राहक आधार आहे. यूजर्सच्या सोयीला प्राधान्य देत कंपनीने दीर्घ-वैधता प्लॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आता ८४ दिवसांपासून ते संपूर्ण ३६५ दिवसांपर्यंत चालणारे विविध जिओ रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे वारंवार रिचार्जची गरज कमी होणार आहे.
कॉलिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध
जिओने आता फक्त कॉलिंगची गरज असलेल्या ग्राहकांची समस्या सोडवली आहे. पूर्वी कॉलिंगसोबत डेटा प्लॅन घ्यावा लागत असल्यामुळे यूजर्सना अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. पण आता कॉलिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.
कमी दरात वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद
जर तुम्ही केवळ कॉलिंगसाठी जिओचा प्लॅन शोधत असाल तर आता तुमच्यासाठी चांगली बातमी समोर आली आहे. जिओने आपल्या प्लॅनमध्ये असा पर्याय जोडला आहे ज्यामध्ये कॉलिंगचा फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही कमी दरात वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.
जिओचा हा विशेष कॉलिंग प्लॅनची किंमत
जिओचा हा विशेष कॉलिंग प्लॅन अत्यंत परवडणाऱ्या ₹१७४८ मध्ये उपलब्ध आहे. या रिचार्जसोबत तुम्हाला तब्बल ३३६ दिवस म्हणजे जवळपास ११ महिन्यांची वैधता मिळते. या कालावधीत तुम्ही विनाअडथळा सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता.
कॉलिंगसोबतच अनेक फायदे
या प्लॅनसोबत जिओ ग्राहकांना मोफत कॉलिंगसोबतच ३,६०० फ्री एसएमएसची सुविधा मिळते, ज्यामुळे तुम्ही मनसोक्त मेसेजिंग करू शकता. याशिवाय, या पॅकमध्ये मनोरंजन आणि तंत्रज्ञानाचेही फायदे आहेत. यूजर्सना जिओ टीव्हीवर मोफत चॅनेल्स पाहता येतात आणि जिओ एआय क्लाउडचीही मोफत सुविधा मिळते.
आणखी एक प्लॅन उपलब्ध
₹१७४८ चा जिओ प्लॅन केवळ व्हॉइस आणि एसएमएससाठी उपलब्ध आहे. हा प्लॅन महाग वाटत असल्यास यूजर्ससाठी आणखी एक पर्याय आहे ₹४४८ चा व्हॉइस कॉलिंग रिचार्ज. या पॅकमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळते, ज्यामुळे कमी खर्चात कॉलिंगची सुविधा मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.