WhatsApp Account: आता एक WhatsApp अकाउंट चार डिव्हाइसवर चालेल, करा 'या' काही सोप्या ट्रिक्स

Dhanshri Shintre

व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप हे जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. जे यूजर्सना कॉल, मेसेजिंग आणि इतर अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देते.

एक खास फिचर

व्हॉट्सअ‍ॅपच्या एका खास फीचरसंबंधी चर्चा करणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही एकाच अकाउंटवर एकाच वेळी अनेक डिव्हाइसेसवर मेसेजिंग करू शकता.

WhatsApp Companion Mode

आम्ही WhatsApp Companion Mode विषयी सांगत आहोत. जो Link Devices पर्यायाद्वारे सेटिंग्जमध्ये सापडतो आणि अनेक डिव्हाइसवर एकच अकाउंट वापरण्यास अनुमती देतो.

एकाच वेळी चार फोनवर

या फिचरच्या मदतीने तुम्ही एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर एकाच वेळी चार वेगवेगळ्या फोनवर मेसेजिंग आणि कॉलिंग सहजपणे करू शकता.

पायरी १

यासाठी, सर्वप्रथम तुमच्या फोनवर WhatsApp उघडा आणि नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करा, जे सेटिंग्ज पर्याय दाखवेल.

पायरी २

येथे विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी लिंक्ड डिव्हाइसेसवर क्लिक केल्यास QR कोड स्कॅनर उघडतो, ज्याद्वारे तुम्ही कंपॅनियन डिव्हाइस लिंक करू शकता.

पायरी ३

डेस्कटॉपवर WhatsApp वापरण्यासाठी WhatsApp Web किंवा अॅप वापरा. QR कोड स्कॅन केल्यावर तुमचे अकाउंट डेस्कटॉपशी सहज कनेक्ट होईल आणि मेसेजिंग सुरू करता येईल.

पायरी ४

तुमच्या मोबाईलवर WhatsApp उघडा आणि लॉगिन पेजवर तीन डॉट्सवर टॅप करा. येथे तुम्हाला Companion Mode पर्याय दिसेल, ज्याद्वारे अनेक डिव्हाइस लिंक करता येतात.

पायरी ५

येथे एक QR कोड दिसेल, जो लिंक डिव्हाइस पर्यायाद्वारे तुमच्या मुख्य फोनवर स्कॅन करावा लागेल आणि यामुळे तुम्ही WhatsApp वर लॉग इन होऊ शकता.

NEXT: एअरटेलचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, वर्षभर सिम राहिल सक्रिय; किंमत किती?

येथे क्लिक करा