Dhanshri Shintre
एअरटेल ग्राहकांसाठी २८ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंत वैध असलेल्या विविध रिचार्ज आणि सबस्क्रिप्शन योजना उपलब्ध करते.
काही यूजर्ससाठी त्यांचे सिम कार्ड सक्रिय ठेवणे आवश्यक असते. यासाठी एअरटेलने किमान रिचार्ज योजना निश्चित केली आहे. ज्यामुळे सेवा वर्षभर चालू राहू शकेल.
कमी किमतीत सिम सक्रिय ठेवणारा, कॉलिंग आणि डेटा युक्त प्लॅन मिळाल्यास यूजर्सना अधिक फायदे आणि आरामदायक अनुभव मिळतो.
एअरटेल १९९ रुपयांचा प्लॅन देत आहे. ज्याची वैधता २८ दिवस आहे आणि तो कॉलिंग व डेटा सुविधा पुरवतो.
या एअरटेल प्लॅनमध्ये फक्त डेटा नव्हे, तर २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० SMS सुविधा देखील मिळतात.
या प्लॅनमध्ये तुम्हाला अतिरिक्त फायदे देखील मिळतात, ज्यात कोणतेही अतिरिक्त शुल्क न लावता स्पॅम कॉल आणि मेसेजपासून संरक्षणाचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, कंपनी Perplexity Pro AI चे सबस्क्रिप्शन देखील ऑफर करते, ज्याची किंमत ₹१७,००० आहे.
कमी किमतीत सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय आहे. मात्र, वार्षिक सबस्क्रिप्शन घेणे तुम्हाला आणखी किफायतशीर ठरू शकते.