Delhi Crime  Saam Tv
देश विदेश

Shocking: दिल्ली हादरली! बापलेकाला नग्न करत अमानुष मारहाण, आरोपींनी महिलेलाही सोडलं नाही; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Delhi Crime: दिल्लीमध्ये बापलेकाला नग्न करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींनी पीडित व्यक्तीच्या बायकोला शिवीगाळ करत तिची छेड काढली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

Priya More

Summary -

  • दिल्लीच्या लक्ष्मीनगरमध्ये बापलेकांना भररस्त्यात अमानुष मारहाण

  • निर्वस्त्र करत भररस्त्यात मारहाण केली

  • पीडित व्यक्तीच्या बायकोची आरोपींनी छेड काढली

  • घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागामध्ये एक भयंकर घटना घडली. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी बाप आणि मुलाला भररस्त्यात निर्वस्त्र करत बेदम मारहाण करण्यात आली. तर आरोपींनी या व्यक्तीच्या बायकोची छेड काढली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका तरुणाला अटक केली. तर इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात पीडित राजेश गर्ग (५२ वर्षे) यांची जिम आहे. या जिमवर आरोपींनी कब्जा केला. त्यानंतर राजेश गर्ग आणि त्यांचा मुलगा वासू (२६ वर्षे) यांना नग्न करून अमानुष मारहाण केली. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी राजेश गर्ग यांच्या बायकोला शिवीगाळ करत आरोपींनी कुटुंबातील महिले असभ्य वर्तन केले. घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलल झाले. या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित राजेश गर्ग हे त्यांच्या कुटुंबासह लक्ष्मीनगर येथील बँक एन्क्लेव्हमध्ये राहतात.२ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. राजेश यांच्या बायकोने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी सांगितले की, त्यांच्या घराच्या तळघरात एक जिम उघडली होती. या ठिकाणी सतीश यादव नावाच्या व्यक्तीला जिमची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवले होते. काही काळानंतर सतीशने जिमचा ताबा घेतल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबाने ताबा परत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी भांडणे सुरू केली.

तक्रारीत असेही म्हटले आहे की, आरोपी सतीशसोबत जिममध्ये १५ ते २० मुले राहतात आणि त्यांना शिवीगाळ आणि त्रास देतात. २ जानेवारी रोजी सीवर लाइन ब्लॉक झाल्यामुळे घरात पाणी साचले होते. या सीवरचे कनेक्शन जिम बांधलेल्या बेसमेंटमध्ये आहे. राजेश गर्ग आणि त्यांची बायको बेसमेंटमध्ये जाऊ लागले. यावर तिथे उपस्थित असलेल्या एका मुलाने सतीशला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी महिलेच्या नवरा आणि मुलाला मारहाण करण्यास सुरूवात केली.

आरोपींनी तक्रारदार महिलेचा नवऱ्याला नग्न केले आणि जिमच्या रॉडने मारहाण केली. पीडत महिलेशी गैरवर्तन केले आणि तिला असभ्य वागणूक दिली. पीडित महिलेच्या नवऱ्याने तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. यादरम्यान आरोपी त्यांच्या घरात घुसले आणि त्यांचा मुलगा वासूला रस्त्यावर ओढत नेले त्याची पँट काढली आणि त्यालाही मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार स्थानिक नागरिक पाहत होत पण कुणीच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर आरोपी पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव धेत जखमी झालेल्या कुटुंबाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास यादव, शुभम यादव, ओंकार यादव आणि पिंटू यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली तर उर्वरीत आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT