Crime: घरात घुसून हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, झाडाला बांधून केसही कापले; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Bangladesh Crime: बांगलादेशमध्ये हिंदू महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी त्यानंतर महिलेला झाडाला लटकवत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली.
Crime: घरात घुसून हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, झाडाला बांधून केसही कापले; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
Bangladesh CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचाराच्या घटना थांबेना

  • घरात घुसून दोन आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला

  • महिलेला झाडाला बांधून अमानुष छळ केला तिचे केस कापले

  • घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाही. बांगलादेशमध्ये अनेक हिंदू तरुणांची हत्या केल्यानंतर आता एका ४० वर्षीय विधवा महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर आरोपींनी महिलेला झाडाला बांधले आणि तिचे केसही कापले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बांगलादेशच्या झेनाइदाह जिल्ह्यातील कालीगंज उपविभागात घडली. ४० वर्षीय हिंदू महिलेवर दोन पुरूषांनी घरात घुसून सामूहिक बलात्कार केला. महिलेने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेने तक्रारीत म्हटले की, तिने अडीच वर्षांपूर्वी कालीगंज नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ७ मधील शाहीन आणि त्याच्या भावाकडून २० लाख रुपयांना एक दुमजली घर आणि तीन डेसिमल जमीन खरेदी केली होती. त्यानंतर शाहीनने तिच्याशी अश्लील वर्तन केले आणि तिने नकार दिल्यावर तिला त्रास देऊ लागला.

Crime: घरात घुसून हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, झाडाला बांधून केसही कापले; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

शनिवारी संध्याकाळी गावातील दोन नातेवाईक महिलेला भेटायला तिच्या घरी आले होते. तेव्हा शाहीन आणि त्याचा साथीदार हसन यांनी जबरदस्तीने घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिच्याकडे ३७,००० रुपये मागितले. जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी महिलेच्या नातेवाईकांवर हल्ला केला आणि त्यांना घरातून पळवून लावले. जेव्हा महिलेने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांनी तिला एका झाडाला बांधले आणि तिचे केस कापले.

Crime: घरात घुसून हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, झाडाला बांधून केसही कापले; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपींनी महिलेला तोपर्यंत टॉर्चर केले जोपर्यंत ती बेशुद्ध पडत नाही. आरोपी गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी सांगितले की, सुरूवातीला महिलेने तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितले नव्हते. पण तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यासोबत बलात्कार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी महिलेने कालीगंज पोलिस ठाण्यात शाहीन आणि हसनविरोधात तक्रार दाख केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Crime: घरात घुसून हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार, झाडाला बांधून केसही कापले; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
Bangladesh: बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या, जमावाकडून आधी धारदार शस्त्राने वार; नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com