Rohit Sharma Record: रोहितचं खास शतक पूर्ण! बांगलादेशच्या नमवताच कोहली, धोनीच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Rohit Sharma Won 100 International Matches As Captain: बांगलादेशला हरवताच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.
Rohit Sharma Record: रोहितचं खास शतक पूर्ण! बांगलादेशच्या नमवताच कोहली, धोनीच्या क्लबमध्ये केली एन्ट्री
rohit sharmatwitter
Published On

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. बांगलादेशला धूळ चारल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही खास शतक पूर्ण केलं आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माने १०० सामने जिंकले आहेत.

तो मोहम्मद अझहरुद्दीन, विराट कोहली आणि एमएस धोनीनंतर असा कारनामा करणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितने कर्णधार म्हणून १३८ वा सामना खेळताना हा कारनामा करुन दाखवला आहे.

Rohit Sharma Record: रोहितचं खास शतक पूर्ण! बांगलादेशच्या नमवताच कोहली, धोनीच्या क्लबमध्ये केली एन्ट्री
IND vs BAN Live Updates : नंबर वन बॅट्सनची नंबर 1 कामगिरी, भारताचा बांगलादेशवर दमदार विजय

कर्णधार म्हणून रोहितचं शतक पूर्ण

विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली होती. तेव्हापासून तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं. सध्या तो वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. रोहितने कर्णधार म्हणून आतापर्यंत १३८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १०० सामने जिंकले आहेत.

Rohit Sharma Record: रोहितचं खास शतक पूर्ण! बांगलादेशच्या नमवताच कोहली, धोनीच्या क्लबमध्ये केली एन्ट्री
Champions Trophy: आता तर हद्दच पार केली..पाकिस्तानात पुन्हा एकदा भारतीय झेंड्याचा अपमान; VIDEO पाहून राग अनावर होईल

त्याची विजयाची सरासरी ७२ हून अधिक आहे. ही सरासरी २२ हून अधिक सामने खेळणाऱ्या कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. जर धोनीची विजयाची सरासरी ५३.६१ आहे. तर मोहम्मद अझहरुद्दीन यांची विजयाची सरासरी ४७.०५ आणि विराट कोहलीची सरासरी ६३.३८ इतकी आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. आता भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Rohit Sharma Record: रोहितचं खास शतक पूर्ण! बांगलादेशच्या नमवताच कोहली, धोनीच्या क्लबमध्ये केली एन्ट्री
Champions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान मॅचचा बोलबाला; PCB प्रमुखांनी विकली VIP तिकीटं, मिळवले ९४ लाख रुपये

भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला हा निर्णय फसला. भारतीय गोलंदाजांनी ५० धावांच्या आत बांगलादेशच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.

त्यानंतर जाकीर अली आणि हृदोयने १५४ धावांची भागीदारी करत बांगलादेशची धावसंख्या २०० पार पोहोचवली. बांगलादेशकडून हृदोयने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली. तर जाकीर अलीने ६८ धावा केल्या. बांगलादेशचा संपूर्ण डाव २२८ धावांवर आटोपला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. रोहित ४१ धावा करत माघारी परतला. तर गिलने नाबाद शतकी खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. शेवटी केएल राहुलनेही त्याला चांगली साथ देत नाबाद ४१ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com