

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट
मृतांमध्ये बस कंडक्टर यांचा मृ्त्यू
कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या बॉम्बस्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे. या बॉम्बस्फोटात उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी अशोक कुमार (वय वर्ष ३४) यांचा मृत्यू झाला आहे. अशोक हा बस कंडक्टर म्हणून कार्यरत होता. दिल्लीत आपलं काम पूर्ण करून अशोक नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य पूर्ण घरी परतत होता. मात्र, घरी परत येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अशोकचे वडिलोपार्जित घर अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरोला गावात आहे. त्यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. अशोक त्याच्या वृद्ध आईचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा एकमेव आधार होता. मात्र, आईचा आधार हरपला. आईची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लेकाच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली नाही.
अशोकचा चुलत भाऊ सोमपाल शर्मा यांनी सांगितले की, टीव्हीवर बातमी प्रसारित झाल्यानंतरच पोलीस गावात आले. त्यांनी कुटुंबाची चौकशी केली. भावाच्या मृत्यूबाबत माहिती मिळताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेच्या कुटुंबाला सरकारने पुरेशी भरपाई द्यावी तसेच दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी, अशी मागणी कुटुंबाने केली. अशोकसारखा साधा माणूस दहशतवादी कटात बळी पडला, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अशोक केवळ त्याच्या मुलांचा आणि पत्नीचा आधार नव्हता, तर त्याच्या धाकट्या भावाचा आणि वृद्ध आईचाही आधार होता. घटनेची माहिती पसरताच मंगरोला गावा शोककळा पसरली आहे. अशोकच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी दिल्लीच्या दिशेनं धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावात परत आणण्याची तयारी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.