Crime News: तिहेरी हत्याकांडानं लक्ष्मीनगर हादरलं; आई, बहीण आणि भावाच्या हत्येनंतर आरोपीनं पोलीस स्टेशन गाठलं

Brutal Triple Homicide in Delhi: दिल्लीमधील लक्ष्मीनगरमध्ये तिहेरी हत्याकांडची घटना घडलीय. एक मुलाने आपली आई, बहीण,आणि भावाची हत्या केली.
Brutal Triple Homicide in Delhi:
Police investigation underway after a shocking triple murder case reported from Laxmi Nagar in Delhi.saam tv
Published On
Summary
  • दिल्लीतील लक्ष्मीनगरमध्ये खळबळजनक तिहेरी हत्याकांड

  • आरोपीने आई, बहीण आणि भावाची निर्घृण हत्या केली

  • हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठले

दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात एक खळबळजनक तिहेरी हत्याकांड घडलंय. एका तरुणाने स्वतःच्या कुटुंबीयांची हत्या केली. आई, बहीण, आणि भावाची निर्घृणपणे हत्या केली. कुटुंबियांच्या हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिसांकडे जमा झाला. दरम्यान या घटेनमुळे परिसरात खळबळ उडालीय. तिहेरी हत्याकांडाचीही घटना लक्ष्मीनगरमध्ये घडलीय. या हत्याकांडाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

Brutal Triple Homicide in Delhi:
पहिल्या महिला रिक्षा चालकाचा मृत्यू, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. हत्येचे कारण सध्या अस्पष्ट आहे. या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. सध्या हत्येचे कारण अस्पष्ट आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. त्यानंतरच या भयानक घटनेमागील खरे कारण समोर येईल.

Brutal Triple Homicide in Delhi:
Nagpur Crime : मैत्रिणीच्या नावाने चिडवलं म्हणून संतापला, जवळच्या मित्राला जीव जाईपर्यंत मारलं; नागपुरातील धक्कादायक प्रकार

एका शेजाऱ्याने घटनेची माहिती दिली

सुरुवातीच्या तपासात घरगुती वाद झाल्यानं हा हत्याकांड झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु हत्येचे खरे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत. आरोपी तरुणाच्या शेजारी राहणारे शेजारी महेश शर्मा यांनी याप्रकरणी सांगितलं की, जेव्हा पोलिस येथे पोहोचले तेव्हा आम्हाला या घटनेची माहिती मिळाली.

हत्यारा मुलगा पोलिसात जमा

महेश शर्मा म्हणाले की, आई, मुलगी आणि मुलाची हत्या करण्यात आलीय. मारेकरी देखील कुटुंबातील सदस्य होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात कुटुंबातील एका मुलाने आपली आई, बहीण, भावाचा खून केला. त्यानंतर तो स्वत: पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि हत्येची माहिती दिली. मृत पावलेल्या कुटुंबातील सदस्य हे दररोज मदिरात जात होते, पण आज त्यांना कोणी मंदिरात जाताना पाहिलं नाही.

आरोपी मुलगा आर्थिक अडचणीत होता

पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव यशवीर सिंग आहे. मृतांची ओळख पटली असून आई कविता (४६), बहीण मेघना (२४) आणि भाऊ मुकुल (१४) अशी हत्या झालेल्याची नावे आहेत. यशवीर लक्ष्मी नगरमधील मंगल बाजार परिसरात राहत होता. तिघांची हत्या केल्यानंतर हत्यारा मुलगा पोलीस स्टेशनमध्ये गेला. तेथे त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या घरी गेली. तेथून पोलिसांनी तिन्ही मृतदेहांना ताब्यात घेतले. आर्थिक अडचणीत असल्यानं त्याने या हत्या केल्याचं सांगितलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com