Crime: नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, बायकोची सटकली; पोटच्या २ मुलांना विष पाजलं

Bihar Crime: बिहारमध्ये नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर संतप्त झालेल्या महिलेने आपल्या दोन मुलांना विष पाजलं. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली.
Crime: नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, बायकोची सटकली; पोटच्या २ मुलांना विष पाजलं
Bihar CrimeSaam Tv News
Published On

Summary -

  • नवऱ्यासोबतच्या वादानंतर महिलेने टोकाचं पाऊल उचललं

  • दोन निष्पाप मुलांना विष देऊन हत्या केली

  • पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली

बिहारमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली. ही घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात घडली. नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर महिलेने हे भयंकर कृत्य केले. काही महिन्यांपूर्वी ओब्रा ब्लॉकच्या खुडवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पथरा गावात विषारी लाडू खाल्ल्याने दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणात मुलांच्या आईला पोलिसांनी अटक केली. तिनेच आपल्या मुलांना लाडूत विष मिक्स करून खायला दिल्याचे उघड झाले

पथरा गावात विष मिसळलेला लाडू खाल्ल्याने दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुलांच्या कुटुंबियांनी काही अज्ञात लोकांवर संशय व्यक्त केला होता. पण तपासादरम्यान धक्कादायक कारण समोर आले. तपासादरम्यान पोलिसांना मृत मुलांची आई संयुक्ता कुमारीवर संशय आला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला.

Crime: नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, बायकोची सटकली; पोटच्या २ मुलांना विष पाजलं
Crime: अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या, एक्स बॉयफ्रेंडच्या घरात सापडला मृतदेह; शरीरावर चाकूचे अनेक वार

आरोपी महिलेने सांगितले की, तिचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. यादरम्यान सल्फा मिसळलेला गहू छतावर ठेवण्यात आला होता. तिने तो आणून तिच्या मुलांना खायला दिला आणि नंतर तो स्वतः देखील खाल्ला. नंतर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. महिलेची प्रकृती स्थिर आहे आणि तिने सल्फा देखील सेवन केल्याचा दावा बनावट मानला जात आहे.

Crime: नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, बायकोची सटकली; पोटच्या २ मुलांना विष पाजलं
Nagpur Crime : मैत्रिणीच्या नावाने चिडवलं म्हणून संतापला, जवळच्या मित्राला जीव जाईपर्यंत मारलं; नागपुरातील धक्कादायक प्रकार

गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी संयुक्ता कुमारीला अटक केली. मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महिलेने दावा केला होता की मुलांनी लाडू खाल्ले होते. पण मुलांनी लाडू नव्हते खाल्ले हे तपासातून उघड झाले. महिलेने दोन्ही मुलांना सल्फाच्या गोळ्या खायला दिल्या होत्या. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तपासातून उघड झाले. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Crime: नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, बायकोची सटकली; पोटच्या २ मुलांना विष पाजलं
Nashik Crime : प्रेमाचा भयानक शेवट! काका-पुतण्याने २३ वर्षाच्या रवीचा जीव घेतला; चॉपर, लाकडी दांडक्याने मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com