नाशिकमध्ये हत्येचा थरार
एका तरुणाची काका पुतण्याने मिळून केली हत्या
प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज
आरोपींना काही तासांत अटक
नाशिकच्या पंचवटीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन गुंडांनी चॉपर व लाकडी दांडक्याने हल्ला करून एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नाशिकमधील पेठरोड परिसरातील अश्वमेधनगर येथे घडली. मृत तरुणाचे नाव रवी संजय उशिले (Ravi Ushile) असे आहे. तर आरोपींची नावे ओम गवळी आणि संतोष गवळी असे आहे. हे दोघेही काका पुतणे असल्याचा समोर आलं आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास समाधान जेवण झाल्यानंतर घराबाहेर शतपावली करीत होता. त्यावेळी घरी परतताना समाधानचा मित्र रवी उशिले त्याला भेटला. दोघेही परिसरात गप्पा मारत उभे असताना दोन संशयित तिथे पोहोचले.
ओम याने चॉपरने, तर संतोषने लाकडी दांडक्याने रवीवर हल्ला केला. त्यात रवीचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या समाधान बंडू गोऱ्हे याने म्हसरूळ पोलिसांत फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिवाय घटनेचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई केली.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विल्होळी येथील सीएनजी पेट्रोल पंपाच्या मागे लपून बसलेल्या संशयितांना पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतलं. दरम्यान रवीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असून, त्या विरोधातून काका-पुतण्यांनी त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाय घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.