Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?

Lonavala Lions Point Tragedy : लोणावळा येथील लायन्स पॉईंट दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडला. घरातून कामावर जातो सांगून निघाला तो परत घरी गेलाच नाही. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?
Lonavala Lions Point TragedySaam Tv
Published On
Summary
  • लायन्स पॉईंटच्या ७०० फूट खोल दरीत मृतदेह सापडला

  • तरुण कामाच्या नावाने बाहेर पडून गेला पण परतला नाही, कुटुंबाची तक्रार

  • शिवदुर्ग बचाव पथक व ग्रामीण पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर

  • मृत्यू अपघात की घातपात? पोलिस तपास सुरू

दिलीप कांबळे, मावळ

लोणावळा परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथील खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. मृत तरुणाचे नाव परेश हटकर असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी परेश यांनी कुटुंबियांना मी कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडले. यानंतर ते घरी परतलेच नाही. परेश घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परेश यांचा शोध घेतला असता त्यांची गाडी लायन्स पॉईंटवर उभी असल्याची माहिती मिळाली.

Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?
Nagpur : नागपूरमध्ये आई वडिलांचा क्रूरतेचा कळस, १२ वर्षाच्या लेकाला साखळीने बांधलं, घरातच डांबून ठेवलं; नेमकं काय प्रकरण?

पोलिसांना माहिती मिळताच तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम राबवली. रोपच्या साहाय्याने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरून परेश हटकर यांचा शोध घेतला असता परेश हटकर हे मृतावस्थेत सापडले. लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने मृतदेह टायगर पॉईंट दरीतून वर बाहेर काढला. यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

Shocking : कामावर गेला तो परतलाच नाही, लोणावळ्यात ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह, लायन्स पॉईंटवर नेमकं काय घडलं?
Sambhajinagar : धावत्या दुचाकीवरून तरुणाला खाली ओढलं, कारमध्ये टाकून पसार झाले; संभाजीनगरमध्ये अपहरणाचा थरार!

शिवदुर्ग बचाव पथकाने लोणावळा ग्रामीण पोलीस आणि नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी शवविच्छेदनासाठी रवाना केला. यादरम्यान पोलिसांन समोर एक मोठा पेच निर्माण झाला. परेश हटकर या खोल दरीत पडले की, घातपात आहे? याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com