Shreya Maskar
हिवाळ्यात मजबूत हाडे, निरोगी शरीर ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा. तुम्ही नियमित एक जवसाचा लाडू खा.
जवसाचे लाडू बनवण्यासाठी जवसाच्या बिया, साखर, गूळ, ड्रायफ्रूट, सुके खोबरे, खसखस, मखाना इत्यादी साहित्य लागते.
जवसाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम प्रॅनमध्ये तूप टाकून जवसाच्या बिया भाजून घ्या. त्यानंतर जवस थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर बनवा.
दुसऱ्या पॅनमध्ये तूप टाकून बदाम, मखाना, काजू, सुके खोबरे, खसखस भाजून घ्या. तुम्ही फक्त १०-१५ मिनिटांत लाडू बनवू शकता.
आता मिक्सरमध्ये भाजलेले बदाम, काजू, मखाना वाटून घ्या. याची जाडसर पेस्ट बनवा. हिवाळ्यात शरीराला उबदार देण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जवसाच्या बिया हा सर्वोत्तम मार्ग आहे.
एका बाऊलमध्ये ड्रायफ्रूट्स पूड, सुके खोबरे, खसखस आणि जवसाची बारीक पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
जवसाचे लाडू खाल्ल्यामुळे सांधेदुखी कमी होते. तसेच हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
लाडूची पौष्टिकत्ता वाढवण्यासाठी तुम्ही यात साखरे ऐवजी गूळ घालू शकता. यामुळे लाडूला नैसर्गिक गोडवा येईल. गूळ जास्त शिजवू नका, नाहीतर लाडू कडक होऊ शकतात.