Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Shreya Maskar

शिराळ्याची चटणी

शिराळ्याची चटणी बनवण्यासाठी कोवळी शिराळी, ओले खोबरे, चिंचेचा कोळ, हळद, मोहरी, हिंग, उडीद डाळ, सुक्या मिरच्या इत्यादी साहित्य लागते.

Shirala Chutney | yandex

फोडणीचे साहित्य

फोडणी बनवण्यासाठी तीळाचे तेल, मोहरी, उडीद डाळ, हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.

Shirala Chutney | yandex

शिराळी

शिराळ्याची चटणी बनवण्यासाठी शिराळी वरवर तासून तुकडे करा. त्यानंतर शिराळी कुकरला लावून १-२ शिट्टी करून घ्या.

Shirala | yandex

सुक्या लाल मिरच्या

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, सुक्या लाल मिरच्या, भाजलेले उडीद डाळ छान गोल्डन फ्राय परतून घ्या.

Dry Red Chilies | yandex

चिंचेचा कोळ

यात शिराळ्याचे तुकडे, ओले खोबरे, हिंग, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून व्यवस्थित बारीक करा.

Tamarind Pulp | yandex

फोडणी

आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. त्याची जाडसर पेस्ट बनवा. यात पाणी टाकू नका.

Chutney | yandex

तेल

शेवटी छोट्या कढईत तेल टाकून फोडणीचे सर्व मसाले टाकून चांगली फोडणी तडतडू द्या. त्यानंतर ती शिराळ्याच्या चटणीमध्ये टाका.

oil | yandex

भात

आंबट, तिखट अशी शिराळ्याची चटणी गरम भात आणि तूपासोबत खा. एक घास खाताच तुमचे मन तृप्त होईल.

Rice

NEXT : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

Bajra Dhapate Recipe | yandex
येथे क्लिक करा...