Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

Shreya Maskar

नाश्त्याचा पदार्थ

बाजरीचे धपाटे महाराष्ट्रामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात आणि मराठवाड्यात, विदर्भात बनवले जातात. यामुळे शरीराला अधिक पोषण मिळते.

Bajra Dhapate | yandex

बाजरीचे धपाटे

बाजरीचे धपाटे बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, मेथी, कोबी, कोथिंबीर, मिरची-आलं पेस्ट, धने पावडर, काळीमिरी पावडर, मीठ, हळद, तीळ, ओवा, तूप, दही, गूळ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Bajra Dhapate | yandex

बाजरीचे पीठ

बाजरीचे धपाटे बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या बाऊलमध्ये बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, मेथी, कोथिंबीर, तीळ, ओवा, जिरे, हळद, तिखट, मीठ, हिरवी मिरची-आलं पेस्ट, दही आणि गूळ घालून चांगले मिक्स करा.

Bajra Flour | yandex

कणिक मळा

यात गरजेनुसार पाणी टाकून मऊसर कणिक मळून घ्या. कणिक जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही, याची काळजी घ्या.

Knead the Dough | yandex

तेल

आता पिठाचे छोटे गोळे करून पोळपाटाला तेल लावून धपाटे थापून घ्या. हाताला कणिक चिकटू नये म्हणून बाजरीचे सुके पीठ लावा.

Oil | yandex

तूप

पॅनमध्ये तूप टाकून बाजरीचे धपाटे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. धपाटे भाजताना गॅस मंद आचेवर ठेवा. जेणेकरून धपाटे जळणार नाही.

Ghee | yandex

दही

तुम्ही थंड दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत बाजरीच्या धपाट्यांचा आस्वाद घ्या. थंडीत सकाळी नाश्त्यासाठी हा पौष्टिक पदार्थ आहे.

Yogurt | yandex

टीप

तुम्ही पदार्थाची पौष्टिकता वाढवण्यासाठी यात बारीक कोबी, पालकची पेस्ट देखील टाकू शकता.

Bajra Dhapate | yandex

NEXT : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

Konkan Food | yandex
येथे क्लिक करा...