Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

Shreya Maskar

वालाची आमटी

वालाची आमटी बनवण्यासाठी अंकुरलेली वाल, कांदे, टोमॅटो, तेल, जिरे, मिक्स मसाला, हळद, कोथिंबीर, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते.

Konkan Food | yandex

मोड आलेले वाल

वालाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाल एक रात्र पाण्यात ठेवून त्याला मोड येऊ द्या. त्यानंतर सकाळी त्यातील पाणी वेगळे करा.

Valachi Amti | yandex

फोडणी

वालाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि फोडणीचे सर्व मिश्रण टाकून मिक्स करा. फोडणी चांगली तडतडू दे.

Konkan Food | yandex

टोमॅटो

यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून गोल्डन फ्राय करा. फोडणीला चांगले तेल सुटू द्या. जेणेकरून मसाला चवीला टेस्टी लागले.

Tomatoes | yandex

उकडलेले बटाटे

तुम्ही यात उकडलेले बटाटे टाकू शकता. त्यानंतर पाणी टाकून आमटी एक उकळी काढून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवून द्या.

Boiled Potatoes | yandex

आमटी शिजवा

त्यानंतर मोड आलेले वाल टाकून १०–१२ मिनिटे आमटी शिजवा. यात शेवटी चवीनुसार मीठ टाका.

Konkan Food | yandex

कोथिंबीर

गॅस बंद करून आमटीवर कोथिंबीर भुरभुरवून घ्या. वालाची आमटी हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे.

Coriander | yandex

भात-आमटी

गरमागरम भात, पोळी, भाकरी, पाव यांच्यासोबत वालाच्या आमटीचा आस्वाद घ्या.

Konkan Food

NEXT : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बॉम्बे मसाला सँडविच, वाचा झटपट होणारी रेसिपी

Bombay Masala Sandwich Recipe | yandex
येथे क्लिक करा...