Shreya Maskar
बॉम्बे मसाला सँडविच बनवण्यासाठी ब्रेड, काकडी, टोमॅटो, कांदा, उकडलेले बटाटे, चाट मसाला, काळे मीठ, काळी मिरी, हिरवी चटणी, चीज, लोणी इत्यादी साहित्य लागते.
बॉम्बे मसाला सँडविच बनवण्यासाठी काकडी, टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांचे गोल पातळ स्लाइस करून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर यात बीट, शिमला मिरची टाका.
ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावून त्यावर हिरवी चटणी पसरवा. तुम्ही यावर आंबट -गोड मिक्स चटणी देखील लावू शकता.
त्यानंतर ब्रेडवर काकडी, टोमॅटो , शिमला मिरची, कांदा आणि बीट यांचे काप ठेवा. त्यानंतर यावर चाट मसाला आणि इतर मसाला टाका.
आता यावर भरभरून चीज टाका. तसेच तुम्ही यात पनीरचे स्लाइस देखील टाकू शकता. हे तुमच्या आवडीवर आहे.
शेवटी दुसऱ्या ब्रेड बटर आणि चटणी लावून सँडविच बंद करा. सँडविच मेकअरमध्ये तूप लावून बॉम्बे मसाला सँडविच मस्त टोस्ट फ्राय करा.
त्यानंतर चटपटीत हिरवी चटणी आणि केचअपसोबत बॉम्बे मसाला सँडविचचा आस्वाद घ्या. तुम्ही गरमागरम चहासोबत हा नाश्ता करा.
तुमच्याकडे सँडविच मेकअर नसेल तर पॅनला तूप लावून मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस मसाला सँडविच भाजून घ्या.