Chocolate Cup Cake Recipe : ख्रिसमस स्पेशल! फक्त १० मिनिटांत बनवा चॉकलेट कप केक, लहान मुलं होतील खुश

Shreya Maskar

ख्रिसमस

ख्रिसमसला खास चॉकलेट कप केक बनवा. ही रेसिपी फक्त १० मिनिटांत बनवता येईल. लहान मुलांना खूप आवडेल.

Christmas | yandex

चॉकलेट कप केक

चॉकलेट कप केक बनवण्यासाठी कोको पावडर, मैदा, कस्टर शुगर, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, ‌बेकिंग सोडा, मीठ, न्यूट्रल तेल , दूध, क्रीम, डार्क चॉकलेट, पिठीसाखर, दूध, संत्र्याचा किस इत्यादी साहित्य लागते.

Chocolate Cup Cake | yandex

कोको पावडर

चॉकलेट कप केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कोको पावडर, मैदा, कस्टर शुगर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

Vanilla Essence | yandex

व्हॅनिला इसेन्स

यात न्यूट्रल तेल, दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.

Vanilla Essence | yandex

बेक करा

तयार मिश्रण एका कपमध्ये टाकून २-५ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये बेक करा. तुम्ही पाहिजे तर या मिश्रणात ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.

Chocolate Cup Cake | yandex

डार्क चॉकलेट

पॅनमध्ये ताजी क्रीम आणि डार्क चॉकलेट एकत्र करून मध्यम आचेवर गरम करा. चॉकलेट पूर्णपणे वितळल्यावर ‌त्यात पिठीसाखर आणि दूध घालून चांगले मिसळा.

Dark Chocolate | yandex

संत्र्याचा किस

नंतर त्यात अर्ध्या संत्र्याचा किस घालून एक उकळी काढून घ्या. अशाप्रकारे चॉकलेट सिरप तयार झाले आहे.

Orange | yandex

चॉकलेट

आता कप केकमध्ये हॉट चॉकलेट टाकून सजवा. तुम्ही यावर चोको चिप्स देखील टाकू शकता.

Chocolate Cup Cake | yandex

NEXT : ख्रिसमस स्पेशल चॉकलेट्स; लहान मुलांसाठी घरीच बनवा, वाचा सिंपल रेसिपी

Chocolate Recipe | yandex
येथे क्लिक करा...