Shreya Maskar
न्यू इयर आणि ख्रिसमस पार्टीला खास मुलांसाठी होममेड चॉकलेट्स बनवा. त्यांना हा पदार्थ खूप आवडेल. फक्त १०-१५ मिनिटांत चॉकलेट्स तयार होतील.
होममेड चॉकलेट बनवण्यासाठी मिल्क कंपाउंड चॉकलेट , काजू, बदाम, बिस्किट वॉफल इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीचे साहित्या देखील टाकू शकता.
होममेड चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम मिल्क कंपाउंड चॉकलेट बारीक कापून वितळवून घ्या. तुम्ही गॅसवर डबल बॉयलिंग पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घ्या.
चॉकलेट बनवण्याच्या मोल्डमध्ये थंड झालेले चॉकलेट ओता आणि त्यावर बिस्किट वॉफलचे तुकडे टाका. चॉकलेटचे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ असणार नाही याची काळजी घ्या.
आता यावर काजू, बदामाचे तुकडे टाकून पुन्हा एक चॉकलेटचा लेअर टाका आणि मिश्रण सेट करून घ्या.
चॉकलेट फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ४-५ तास ठेवून द्या. जेणेकरून चॉकलेट खायला आणखी टेस्टी लागतील. तुम्ही ख्रिसमस स्पेशल चॉकलेट मोल्डचा देखील वापर करू शकता.
आता ख्रिसमस पार्टीत मुलांना चॉकलेट देण्यासाठी ती सजवा. चॉकलेट्सना मस्त डिझायन पेपरमध्ये गुंडाळून मुलांना खाऊ द्या.
तुम्ही घरी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स बनवू शकता. फक्त तुम्हाला चांगले चॉकलेट्स फ्लेवरचा यात समावेश करावा लागेल.