Shreya Maskar
यंदा न्यू इयर पार्टीला घरीच सिंपल पद्धतीने बेकरी स्टाइल रेड वेलवेट केक बनवा. एक घास खाताच सर्वजण तुम्ही बनवलेल्या केकचे कौतुक करतील.
रेड वेलवेट केक बनवण्यासाठी मैदा, साखर, बटर, अंड, कोको पावडर, व्हिनेगर, बेकिंग सोडा, दही, लाल रंग, व्हॅनिला एसेन्स आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
रेड वेलवेट केक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये साखर आणि बटर एकत्र करून चांगले फेटून घ्या. त्यानंतर यात अंड मिक्स करा.
त्यानंतर मिश्रणात मैदा, कोको पावडर , दही आणि ड्रायफ्रूट्स घालून चांगलं फेटून घ्या. मिश्रणात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या.
त्यानंतर यात खाण्याचा लाल रंग आणि व्हॅनिला एसेन्स मिक्स करा. तुम्ही यात आवडीनुसार चोको चिप्स देखील टाकू शकतो.
वेगळ्या बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून, ते केकच्या मिश्रणात एकजीव करून घ्या.
आता केकचे मिश्रण चांगले फेटून बेकिंग ट्रेमध्ये घालून ओव्हनमध्ये ३०-४० मिनिटे बेक करा. केकमध्ये चाकू घातल्यावर तो स्वच्छ बाहेर आला, म्हणजे केक पूर्ण शिजला आहे.
केकवर तुमच्या आवडीची डिझायन करा किंवा डेकोरेशन करा. यात तुम्ही चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स, चोको चिप्स यांचा वापर करू शकता.