Shreya Maskar
हिवाळ्यात खास मक्याचे आप्पे बनवा. हा एक पौष्टिक आणि चटपटीत पदार्थ आहे. तसेच तो खूप झटपट बनतो.
मक्याचे आप्पे बनवण्यासाठी मक्याचे दाणे, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर, जिरे, हळद, मिरची पावडर, मीठ, बेसन, तांदळाचे पीठ, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मक्याचे आप्पे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मक्याचे दाणे टाकून जाडसर पेस्ट तयार करा. यात पाणी टाकू नका.
दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, जिरे टाकून एक पेस्ट बनवून घ्या.
एका मोठ्या बाऊलमध्ये दोन्ही मिश्रण एकजीव करून त्यात कोथिंबीर, हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
त्यानंतर शेवटी यात तांदळाचे पीठ, बेसन आणि पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
आप्पे पात्राला चांगले तेल लावून त्यात तयार मक्याचे मिश्रण टाकून १० ते १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्या.
मक्याचे आप्पे गोल्डन फ्राय झाले की पुदिन्याच्या चटणीसोबत त्यांचा आस्वाद घ्या. हा पदार्थ तुम्ही हिवाळ्यात मुलांच्या टिफिनसाठी खास बनवू शकता.