Shreya Maskar
हिवाळ्यात तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. हाडं मजबूत राहतात. तसेच हिवाळ्यातील कोरडी त्वचा चमकदार बनते.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी तीळ, गूळ, शेंगदाणे, ड्रायफ्रूट आणि तूप इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात आवडीनुसार आणखी पदार्थांचा वापर करू शकता.
तिळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात शेंगदाण्याची साल काढून चांगले भाजून घ्या. शेंगदाणे जास्त भाजले जाणार नाही याची, काळजी घ्या.
भाजलेले शेंगदाणे एका बाऊलमध्ये काढून मिक्सरला शेंगदाण्याचा जाडसर कूट तयार करा. जेणेकरून लाडू छान वळता येतील.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात पांढरे तीळ घालून भाजून घ्या. तिळाचा रंग बदल्यानंतर ताटात पसरवून ठेवा.
आता पॅनमध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकून भाजा आणि मिक्सला बारीक करा.
पॅनमध्ये किसलेला गूळ विरघळून घ्या. त्यात तूप, शेंगदाण्याचा कूट, भाजलेले तीळ घालून चमच्याने एकजीव करा.
आता हाताला तूप लावून तिळाचे लाडू वळून घ्या. हवाबंद डब्यात लाडू महिनाभर टिकतील.
गुळाचा पाक योग्य प्रमाणात शिजवणे खूप महत्त्वाचे आहे. पाक खूप जास्त शिजल्यास लाडू कडक होऊ शकतात. मिश्रण गरम असतानाच लाडू वळा. हाताला तूप लावा.