Chinese Bhel Recipe : भेळेला द्या चायनीजचा तडका, वीकेंडची संध्याकाळ होईल चटपटीत

Shreya Maskar

वीकेंड

हिवाळ्यात वीकेंडला नाश्त्याला चटपटीत पदार्थांची मेजवानी करा. यासाठी मुलांची आवडती चायनीज भेळ घरी बनवा.

Chinese Bhel | yandex

स्ट्रीट स्टाइल चायनीज भेळ

स्ट्रीट स्टाइल चटपटीत चायनीज भेळ तुम्ही घरी झटपट बनवू शकता. आताच खास रेसिपी आणि साहित्य लिहून घ्या.

Chinese Bhel | yandex

चायनीज भेळ

चायनीज भेळ बनवण्यासाठी नूडल्स, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मॅगी मसाला, कोबी, चाट मसाला, चायनीज शेव, बटर, टोमॅटो केचप, लिंबाचा रस, शेजवान चटणी इत्यादी साहित्य लागते.

Chinese Bhel | yandex

नूडल्स

चायनीज भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून नूडल्सचे तळून घ्या. नूडल्स मस्त गोल्डन फ्राय करा.

Chinese Bhel | yandex

टोमॅटो केचप

बाऊलमध्ये टोमॅटो केचप, मॅगी मसाला, चाट मसाला आणि शेजवान चटणी टाकून मिक्स करा. एक पेस्ट बनवा.

Tomato Ketchup | yandex

चायनीज शेव

आता मोठा बाऊल घेऊन फ्राय केलेले नूडल्स ,चायनीज शेव आणि तयार मसाला टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

Chinese Bhel | yandex

कोबी

यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोबी, फरसबी या भाज्या टाकून मिक्स करा. शेवटी यावर लिंबाचा रस पिळा.

Cabbage | yandex

कोथिंबीर

यात कोथिंबीर भुरभुरवा आणि टोमॅटो केचप मिक्स करा. चटपटीत स्ट्रीट स्टाइल चायनीज भेळ फक्त १० मिनिटांत तयार झाली.

Coriander | yandex

NEXT : नावडती पडवळची भाजी होईल आवडती; एकदा ट्राय करा 'ही' रेसिपी, दोन घास जास्तच जातील

Padwal Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा....