Shreya Maskar
पडवळची भाजी बनवण्यासाठी पडवळ, मोहरीचे तेल, जिरे, हिंग, बेसन, बडीशेप पावडर, धने पूड, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, हिरवी मिरची, आलं, आमचूर पावडर, गरम मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
पडवळची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पडवळ चांगले धुवून देठ काढून त्याला मध्ये चिरे पाडून घ्या. पडवळातून बिया काढा.
मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल, जिरे आणि चिमूटभर हिंग घालून बेसन चांगले भाजून घ्यावे. पीठ पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या.
यात बडीशेप पावडर, धने पूड, हळद, लाल तिखट, जिरे पूड, हिरवी मिरची, किसलेले आलं मिक्स करा.
त्यानंतर मिश्रणात गरम मसाला, आमचूर पावडर घाला. यात मीठ घालून पुन्हा मिश्रण एकजीव करा. मीठ टाकताना ते जास्त पडणार नाही. याची काळजी घ्या.
तयार सारण चिरलेल्या पडवळमध्ये भरा. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात भरलेले पडवळ खरपूस तळून घ्या.
तुम्हाला ग्रेव्ही भाजी हवी असेल तर सारणात पाणी टाकून त्यांची ग्रेव्ही तुम्ही बनवू शकता. या ग्रेव्हीमध्ये स्टफ पडवळ टाका.
गरमागरम भात किंवा चपातीसोबत स्टफ पडवळचा आस्वाद घ्या. हा पदार्थ सकाळी टिफिनसाठी देखील तुम्ही करू शकता.