Shreya Maskar
ऑफिसवरून आल्यावर ५ मिनिटांत हेल्दी पदार्थ बनवा. फ्रूट खीरची रेसिपी आताच लिहून घ्या. लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल.
फ्रूट खीर बनवण्यासाठी दूध, साखर, फळे, केशर, वेलची पावडर , कॉर्न स्टार्च, सुकामेवा इत्यादी साहित्य लागते. ताजी आणि हिरवीगार फळांचा यात समावेश करावा.
फ्रूट खीर बनवण्यासाठी पॅनमध्ये दूध मंद आचेवर उकळवा. दूध घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा. दूध पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये फळे आणि साखर घालून २-३ मिनिटे शिजवा. (फळे-सफरचंद, केळी, आंबा, द्राक्षे, डाळिंब, पेरू, अननस, बेरी, खजूर )
एका बाऊलमध्ये कॉर्न स्टार्च आणि पाणी घालून पेस्ट बनवा. पेस्ट जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही, याची काळजी घ्या.
आता कॉर्न स्टार्चची पेस्ट उकळत्या दुधात घालून मिक्स करा. दुधात केशर घालून एक उकळी काढून घ्या.
दूध घट्ट झाल्यावर गॅस बंद करून वेलची पूड टाका. तसेच यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील टाका. जेणेकरून खीर अधिक पौष्टिक होईल.
शेवटी खीरमध्ये कापलेली फळे मिक्स करा. फळांचा आकार छोटा असू दे. अशाप्रकारे स्वादिष्ट फ्रूट खीर तयार झाली.