Shreya Maskar
भरड्याचा गोळा भात विदर्भ प्रदेशात बनवला जातो. जिथे तो एक खास अस्सल वऱ्हाडी पदार्थ आहे. हा पदार्थ चणा डाळीच्या भरड्यापासून बनवला जातो.
भरड्याचा गोळा भात बनवण्यासाठी चणा डाळीचा भरडा, बेसन, आले- लसूण पेस्ट, जिरे, तिखट, हळद, मीठ, तेल, तांदूळ, खडे मसाले, हिंग, हळद, कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
चणा डाळीचा भरडा बनवण्यासाठी चणा डाळ रात्रभर भिजवून सकाळी जाडसर वाटून घ्या. त्यात कांद्याची पेस्ट, आलं- लसूण पेस्ट, जिरे, ओवा , मसाले घालून तेलात परता.
भरड्याचा गोळा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळीचा भरडा घेऊन त्यात बेसन, आले-लसूण पेस्ट, जिरे , तिखट, हळद, मीठ आणि तेल घालून चांगले एकजीव करा.
यात थोडेसे पाणी घालून याचे छोटे-छोटे गोळे करून घ्या. दुसरीकडे भातासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. हा पदार्थ तुम्ही आवर्जून रविवारी बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, मिरची, कढीपत्ता, हिंग, हळद आणि खडे मसाले टाकून मस्त फोडणी द्या. यात तुम्ही आणखी मसाले देखील टाकी शकता.
फोडणीत तांदूळ घालून छान परतून घ्या. यात गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून. तांदळाला एक उकळी येऊ द्या.
थोडा भात शिजल्यावर भरड्याचे गोळे त्यात घाला आणि पुन्हा भात शिजवून घ्या.गरमागरम भरड्याचा गोळा भाताचा आस्वाद घ्या.