Shreya Maskar
हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराला चांगले पोषण मिळेल आणि आरोग्य हेल्दी राहील.
जवसाचे लाडू बनवण्यासाठी जवस, गूळ, तांदळाचे पीठ, तूप, सूंठ, काजू, मनुका, सुकं खोबरं, मेथी दाणे इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात जास्तीचे ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.
जवसाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम जवस भाजून घ्या. त्यानंतर जवस थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. जास्त बारीक पावडर करू नका.
यात मेथीचे दाणे हलके भाजून बारीक वाटून घ्या. तसेच तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स भाजून तुकडे करून घ्या. जास्त मोठे तुकडे राहणार नाही याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तूप टाकून तांदळाचे पीठ आणि सुंठ पूड घालून थोडा वेळ परतून घ्या. पीठ परताना गॅस मंद आचेवर ठेवा. जेणेकरून पीठ पॅनला चिकटणार नाही.
गुळाचे पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये गूळ आणि एक कप पाणी उकळून घ्या. पाक घट्ट होईल याची काळजी घ्या.
पाक चांगला झाल्यावर त्यात भाजलेले सर्व साहित्य घालून लाडू नीट वळून घ्या. जेणेकरून पदार्थ अधिक चविष्ट होईल.
थंडीत नियमित एक जवसाचालाडू दुधासोबत खा. यामुळे सांधेदुखी कमी होते आणि शरीराला आराम मिळतो. तयार लाडू हवाबंद डब्यात भरून ठेवा.