Shreya Maskar
बटर चकली बनवण्यासाठी पाणी, बटर, मीठ, कलौंजी, ओवा, तांदूळाचे पीठ, तेल इत्यादी साहित्य लागते.
बटर चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये पाणी घेऊन गरम करून त्यात बटर,चवीनुसार मीठ, कलौंजी, ओवा घालून मिक्स करा.
आता एक उकळी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात तांदूळाचे पीठ घालून एकजीव करा. पीठ सतत ढवळत रहा. जेणेकरून गुठळ्या होणार नाही.
त्यानंतर गॅस बंद करून १० ते १५ मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवून द्यावे. जेणेकरून ते छान मुरेल.
झाकून ठेवलेले पीठ मोठ्या बाऊलमध्ये काढून हाताने दाब देत मळून घ्यावे. म्हणजे पीठ चांगले फुलते.
तयार पीठ चकलीच्या साच्यात भरून चकल्या पाडून घ्या. तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या चकल्या बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चकली गोल्डन फ्राय करा. लक्षात ठेवा चकली तळताना गॅस मंद आचेवर ठेवा.
तांदूळाचे पीठ भिजवण्यासाठी पाण्याऐवजी ताज्या ताकाचा देखील वापर करू शकता. यामुळे पीठ मऊ होते.