Bihar Government Formation Saam Tv
देश विदेश

Bihar Government Formation: बिहारमध्ये पुन्हा 'नितीश सरकार', नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Bihar Government: नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरू आहे.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये नितीश कुमार झाले पुन्हा मुख्यमंत्री

  • नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

  • एनडीएने मोठ्या बहुमताने नवीन सरकार स्थापन केले

  • सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहारमध्ये एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.

एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतरांसह एनडीएचे वरिष्ठ नेते पाटण्यातील गांधी मैदानावर उपस्थित आहेत. भोजपुरी स्टार अभिनेता-गायक मनोज तिवारी आणि पवन सिंह देखील यावेळी उपस्थित आहेत. या शपथविधी सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली आहे

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा भरघोस मतांनी विजय झाला. या निवडणुकीत एनडीएने एकूण २०२ जागा जिंकल्या. यामध्ये भाजपने ८९ जागा जिंकल्या. तर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड ८५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने १९ जागा जिंकल्या. तर हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.

नितीश कुमार यांच्यासोबत कुणी-कुणी मंत्रिपदाची शपथ घेतली -

- सम्राट चौधरी - उपमुख्यमंत्री

- विजय कुमार सिन्हा - उपमुख्यमंत्री

- मंगल पांडे

- डॉ. दिलीप जयस्वाल

- नितीन नबीन

- रामकृपाल यादव

- संजय सिंग 'टायगर'

- अरुण शंकर प्रसाद

- सुरेंद्र मेहता

- नारायण प्रसाद

- राम निषाद

- लखेंद्र पासवान

- श्रेयसी सिंग

- डॉ. प्रमोदकुमार चंद्रवंशी (आमदार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb Benefits: हिवाळ्यात रोज डाळिंब खाल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update:पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

अंधेरी रेल्वे स्थानकावर वृद्ध व्यक्तीकडून मुलीचं धर्मांतर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पोलिस म्हणाले...

8th Pay Commission: १ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका; महागाई भत्ता, HRA आणि ट्रॅव्हल अलाउंस होणार बंद? नेमकं कारण काय?

Dharmendra Health Update: ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? ८ दिवसांनी आली हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT