

बिहार निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झालाय.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षातील काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाजावर प्रश्न उपस्थित केलेत.
बिहारचा निकाल देशभरात राजकीय चर्चेचा ठरलाय.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवलाय. एनडीए आता सरकार स्थापन करणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे. नितीश कुमार यांच्या पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) चे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी बिहारमधील नवीन सरकारच्या स्थापनेबाबत नवीनतम अपडेट दिलेत. दुसरीकडे विरोधकांनी हा विजय निवडणूक आयोगाचा असल्याचं म्हणत एनडीएवर हल्लाबोल केलाय.
यामुळे बिहार निवडणुकीचे निकाल देशभरात चर्चेचा विषय ठरलीय. विरोधकांची आयोगावर टीका होत असतानाच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला, कशामुळे झाला याचे उत्तर पीटीआयला दिलेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिहारमधील काँग्रेसच्या पराभवाला पक्षातील नेत्यांनाच जबाबदार धरलंय.
काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीती यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट बोट ठेवलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस सल्लागारांच्या निर्णय क्षमतेवर गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित केलेत. चव्हाण यांनी काँग्रेसच्या निवडणूक तयारीतील दोष उघडपणे मांडलेत. काँग्रेसने स्वतःचे मूल्यमापन न करता चुकीच्या आकड्यांवर आणि चुकीच्या सल्लागारांवर विसंबून राहत नामी संधी गमावली. काँग्रेसच्या सल्लागारांनी दिलेले अंदाज वास्तवापासून खूप वेगळे होते.
आपल्याकडे १९ जागा होत्या, त्या २१ किंवा २२ झाल्या असत्या, अगदी१७- १८ झाले असते तरी ठीक, पण निवडक ३० जागा लढल्या असत्या आणि राजदला ४० जागा देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. त्यामुळे कदाचित उदारमतवादी भूमिकेमुळे जागा वाढू शकल्या असत्या.
काँग्रेस पक्षाचे आत्मपरीक्षण करत असल्यानं आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा विचारांची लढाई असते तेव्हा ती एक-दोन दिवसात संपत नसते. महात्मा गांधींना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी ,किंवा आंबेडकरांना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी खूप वेळ लागला हे . तो काळ देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. विचारांची लढाई खूप वेदनादायक असते. चढ-उतार असतात. याचं मूल्यांकन करताना मला एक गोष्ट वाटते की, दूरवरून, काँग्रेस पक्षाचे सल्लागार जे मतांचे आरक्षण करत होते, त्यांनी कदाचित योग्य आकडे दिले नसतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.