By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

Jammu-kashmir By Polls Results: बिहारमधील मोठ्या विजयानंतर भाजपने जम्मू आणि काश्मीरमधील नागरोटात विजय मिळवलाय. येथील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने दमदार विजय मिळवला. देवयानी राणा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत नॅशनल कॉन्फरन्सला मोठा धक्का दिलाय.
Jammu-kashmir By Polls Results
Devyani Rana wins Nagrota seat as BJP continues its winning streak after Bihar results.Saam tv
Published On
Summary
  • जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पुन्हा दमदार विजय मिळवला आहे.

  • नगरोटा आणि बडगाम दोन्ही ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचा धक्का बसलाय.

  • देवयानी राणा यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवलाय.

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्येही विजयी गुलाल उधळलाय. त्यामुळे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांना मोठा धक्का बसलाय. बिहार विधानसभासह देशातील सात राज्यांमधील आठ पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर झालेत. यातील जम्मू-कश्मीरमधील नगरोटा आणि बडगाम या दोन विधानसभा जागेवर सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचा पराभव झालाय.

नगरोटा विधानसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केलं. भाजप उमेदवार देवयानी राणा यांनी २४,६४७ मतांच्या आघाडीसह विजय मिळवला. या विजयासह देवयानी राणा यांनी आपल्या वडिलांचा (दिवंगत देवेंद्र सिंह राणा ) यांचा राजकीय वारसा पुढे नेलाय.

देवयानी राणा - ४२,३५० मते

हर्ष देव सिंह (जेकेएनपीपी) - १७,७०३ मते

शमीम बेगम (नेशनल कॉन्फरन्स) - १०,८७२ मते

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच देवयानी यांनी विजयी आघाडी घेतली होती. “नगरोटातील मतदारांनी माझ्या वडिलांना ज्या प्रकारे आशीर्वाद दिले, तसेच मला दिले. मी याची सदैव ऋणी राहीन.” अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या विजयानंतर दिली.

बडगाम विधानसभा जागेवर मोठी चुरशीची लढत झाली. येथे पीडीपी उमेदवार अगा सैयद मुंतजिर मेहदी यांनी विजय मिळवला. त्यांनी नेशनल कॉन्फरन्सचे उमेदवार अगा सैयद महमूद अल-मोसावी यांचा पराभव केला. ४,४७८ मतांच्या फरकाने अगा सैयद मुंतजिर मेहदी यांनी हा विजय मिळवलाय. त्यामुळे हे दोन्ही पराभव नॅशनल कॉन्फरन्ससाठी (National Conference) मोठा धक्का मानला जात आहे.

पोटनिवडणूक का लागली?

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Chief Minister Omar Abdullah) यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यात त्यांनी गांदरबल जागा कायम राखत बडगाम येथील जागा रिक्त केली होती. त्यामुळे येथे पोटनिवडणूक (by-election) घेण्यात आली होती.

तर राजकीय परिस्थितीमुळे नगरोटा जागा ऑक्टोबर २०२४ पासून रिक्त होती. बिहारच्या निकालांसह जम्मू-कश्मीरच्या या पोटनिवडणुकांनी प्रदेशाच्या राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडवून दिलीय. नगरोटावर भाजपने आपली पकड मजबूत ठेवलीय. बडगाममधील पीडीपीचा विजय आगामी राज्यराजकारणात महत्त्वाचा ठरेल.

Jammu-kashmir By Polls Results
Bihar Election Result: लोकसभा ते विधानसभा, चिराग पासवान बिहारच्या राजकारणात किंगमेकर

इतर पोट-निवडणुकीचा निकाल (Other by-election results)

राजस्थानमधील अंता मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. प्रमोद जैन यांनी भाजपचे उमेदवार मोरपाल सुपन यांचा १५,६१२ मतांनी पराभव केला आहे. प्रमोद यांना ६९,५७१ मते मिळाली आहेत. दरम्यान तेलंगणातील (Telangana) ज्युबिली हिल्सची जागा काँग्रेसने जिंकलीय. येथे नवीन यादव यांनी भारत राष्ट्र समितीच्या मांगती सुनीता गोपीनाथ यांचा २४ हजार २९ मतांनी पराभव केला आहे. नवीन यादव यांना ९८ हजार ९८८ मते मिळाली आहेत.

Jammu-kashmir By Polls Results
Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

तर झारखंडच्या (Jharkhand) घाटशिला जागेवर झारखंड मुक्ती मोर्चानं (Jharkhand Mukti Morcha) विजय मिळवलाय. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षातील सोमेश चंद्र सोरेन यांनी विजय मिळवलाय. बाबू लाल सोरेन यांना ३८ हजार पेक्षा जास्त मत मिळाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com