Bihar Election Result: लाडक्या बहिणी नितीश कुमारांच्या पाठीशी; 'या' कारणांमुळे ३७ जिल्ह्यात मिळाली महिलांची साथ

Nitish Kumar Bihar Election : नितीश कुमार यांच्या बिहारमधील प्रचंड विजयात महिला मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. राज्यातील ३७ जिल्ह्यांमधील महिला मतदारांना ७१.७८% मतदान नितीश कुमार यांच्या बाजुने केले. १.२ कोटी महिलांना १०,००० रुपयांची मदत केल्यामुळे आणि एनडीएच्या महिला-केंद्रित योजनांमुळे युतीला २०० जागांपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.
Women Voted Nitish Kumar
Women voters turned out in record numbers across Bihar, giving Nitish Kumar and the NDA a historic victory.
Published On
Summary
  • महिलांच्या प्रचंड मतदानामुळे एनडीएला ऐतिहासिक विजय झाला.

  • ३७ जिल्ह्यांमध्ये महिलांची मतदान टक्केवारी ७१.७८टक्के आहे.

  • महाआघाडीच्या मतांमध्ये मोठी घट झाली आहे.

बिहार विधानसभेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहेत. गेल्या वेळी ५० पेक्षा कमी जागांवर आलेले जेडीयूनं यावेळी ८० जागा मिळावल्या आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए बिहारमध्ये २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतलीय. भाजप,जेडीयू,एलजेपी, आरएलएम आणि एचएएम या पाच पक्षांचा समावेश असलेल्या एनडीएसमोर महाआघाडी चारी मुंड्या चीत झालीय. त्यांच्या संपूर्ण मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. राजद आणि काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी घसरण झालीय.

महिलांनी जिंकवलं

एनडीएच्या मोहिमेचा केंद्रबिंदू मुख्यमंत्री महिला रोजगार योजना होती. ७,५०० कोटी रुपयांच्या योजनेने एनडीएसाठी बेरीजेचं काम केलं. या योजनेतून १.२ कोटी महिलांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं महिलांना प्रत्येकी १०,००० रुपये दिले. फक्त हीच योजना नाही तर दीर्घकाळापासून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या योजनांमुळे जेडीयूला मोठं यश मिळालंय.

मग यात २००६ मधील ५० टक्के पंचायत आरक्षण, ते राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३५ टक्के आरक्षण यासारख्या अनेक महिला सबलीकरणाच्या योजनांमुळे नितीश ैकुमार यांनी विजय मिळवला.

प्रतिमा बदलणाऱ्या योजना

नितीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच महिलांवर लक्ष केंद्रित केल होतं. यातील सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे २००६ मध्ये सुरू झालेली सायकल आणि गणवेश योजना. जेव्हा बिहारच्या मुली सायकलवरून शाळेत जाऊ लागल्या, तेव्हा ते चित्र योजनेचे यश न राहता सामाजिक बदलाचे पोस्टर देखील बनलंय. त्यानंतर २००६ मध्ये पंचायती राज कायदा अंतर्गत पंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण त्यांनी दिले. या निर्णयामुळे तळागाळातील पातळीवर महिलांचा राजकीय सहभाग वाढला.

दारुबंदी कायदा

त्यानंतर नितीश कुमार यांनी २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात दारुबंदी लागू केली. दारू निर्मितीवर सुद्धा त्यांनी बंदी आणली होती. यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली. परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या मनात नितीश कुमार समाज सुधारक नेता असल्याची प्रतिमा बनली.

Women Voted Nitish Kumar
By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

जीविका दीदी’ निवडणुकीपूर्वीचा एक मास्टरस्ट्रोक

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत नितीश कुमार यांच्या सरकारने बचत गटांशी संबंधित १.३ कोटी 'जीविका दिदी'च्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये थेट हस्तांतरित केले. ही योजना नितीश कुमार यांच्यासाठी संजीवनी ठरली. या योजनेतून एकूण १.४ कोटी महिलांना लाभ मिळाला.

राज्यातील अंदाजे ३.५ कोटी मतदारांपैकी जवळजवळ ४०% आहे. योजनेतून मिळालेली १० हजार रुपयांची मदत महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्यात आली होती. या महिला योजनांचा फायदा नितीश कुमार यांना फायदा मिळाला.

Women Voted Nitish Kumar
Bihar Election: बिहारच्या पराभवाचे हादरे महाराष्ट्राला; महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर? VIDEO

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ३८ पैकी ३७ जिल्ह्यांमध्ये महिलांनी भरभरून मते दिली. पुरुषांपेक्षा जास्त मतदान महिलांनी केलं. महिलांचे मतदान ७१.७८ टक्के होतं. तर पुरुषांचे मतदान ६२.९८ टक्के होते. हे बिहारमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक ६७.१३ टक्के मतदान झाले.

महिलांनी पुन्हा नितीश कुमार यांच्यावर विश्वास का ठेवला?

आर्थिक पाठिंब्याव्यतिरिक्त भावनिक घटकाने देखील मतदानावर प्रभाव पाडला. दारूबंदीनंतर राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवल्याने जनमाणसात नितीश कुमार यांची प्रतिमा समाज सुधारक नेता म्हणून झाली होती. दरम्यान नितीश कुमार यांची ही निवडणूक अखेरची निवडणूक आहे, असं अनेकांना वाटून लागलं. यामुळे बिहारला 'जंगल राज' पासून वाचवणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com