Bihar Election: बिहारच्या पराभवाचे हादरे महाराष्ट्राला; महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर? VIDEO

Bihar Election Effect on Maharashtra Politics: बिहारच्या विधानसभा निवडणुकीची काल मतमोजणी पार पडली. दरम्यान, बिहारच्या निवडणुकीचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला आहे.
Bihar Election
Bihar ElectionSaam Tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हादरे बसायला सुरुवात झाली... आता महाराष्ट्रातला महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय... तो नेमका कसा? आणि बिहारच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्राला कसे हादरे बसले आहेत? याबाबत माहिती जाणून घ्या.

Bihar Election
Maharashtra Politics: पुन्हा काका-पुतण्यात दुरावा! बिहार निवडणुकीच्या धामधुमीत भाजपनं खेळला डाव, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

बिहारच्या पराभवाचे हादरे महाराष्ट्रापर्यंत

बिहारचा निकाल लागला आणि विरोधकांच्या दारूण पराभवाचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले. महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनीच एकमेकांकडे बोट दाखवले आहे.काँग्रेस जागावाटपात मोठा वाटा मागत असल्यानेच पराभव होतो, असा टोला अंबादास दानवेंनी कॉंग्रेसला लगावलाय...तर काँग्रेसने बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या चष्म्यातून पाहू नका, अशा सल्ला मित्रपक्षांना दिलाय...

दुसरीकडे राज्यातील महायुतीच्या विजयाप्रमाणेच बिहारचा निकाल लागला असल्यानं भाजपनं आनंद व्यक्त केलाय... एकीकडे काँग्रेसनं मनसेसोबतच्या युतीला स्पष्ट नकार दिलेला असतानाच आयती संधी साधून सत्ताधाऱ्यांनी थेट ठाकरे बंधूंना टार्गेट केलयं......

Bihar Election
Bihar Election Result : बिहारचा मुख्यमंत्री ठरला! नितीश कुमारच होणार CM, एनडीएच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं अनेकदा उघ़ड झालयं... आता बिहारच्या निकालाचे प़डसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पडणार हे निश्चित.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह, महापालिकेचे मैदान मारण्यासाठी विरोधक एकीचं बळ राखतात की स्वबळाचा नारा देऊन जनमताची चाचपणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे..

Bihar Election
Bihar Election: भाजपच्या लाटेमुळे अजितदादांचा डाव चुकला; बिहारमध्ये सुपडासाफ, अनेकांचे डिपॉझिट जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com