Bihar Politics : बिहारमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ; मुलगी रोहिणी आचार्य यांनी घेतला मोठा निर्णय

Bihar Political News : बिहारमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ आलं आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Bihar news
Bihar Political News Saam tv
Published On
Summary

लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठा वाद उफाळला आहे.

रोहिणी आचार्य यांची राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा

रोहिणी आचार्य यांच्या निर्णयामुळे आरजेडीमध्ये खळबळ

पक्षाला २५ जागा मिळाल्यामुळे आरजेडीच्या संघटनात कमकुवतपणा आणि कौटुंबिक हस्तक्षेपावर चर्चा सुरू

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी बिहार निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत राजकारण आणि कुटुंबापासून दूर जात असल्याचे जाहीर केले. संजय यादव आणि रमीज यांच्या दबावामुळे निर्णय घेत असल्याचे रोहिणी यांनी स्पष्ट केलं आहे. रोहिणी यांच्या पोस्टमुळे राष्ट्रीय जनता दलात खळबळ उडाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानतंर राष्ट्रीय जनता दलाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रोहिणी आचार्य यांच्या निर्णयानंतर राष्ट्रीय जनता दलाचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'कुटुंबातील हा अंतर्गत वाद आहे, अशी प्रतिक्रिया आरजेडीने दिली आहे. तर यावर भाजप नेते प्रदीप भंडारी यांनीही प्रतिक्रिया दिली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'कुटुंब विरुद्ध कुटुंब' ही भविष्यवाणी खरी ठरत आहे'.

Bihar news
Mumbra Crime : दहशतवादी विरोधी पथकाची महाराष्ट्रातील मुंब्र्यात धाड; शिक्षकाला घेतलं ताब्यात

रोहिणी आचार्य यांच्या पोस्टनंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. आरजेडीमधील सूत्रांच्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव-राबडी यांनी आतापर्यंत तेजस्वी यांना संजय यादव यांच्याविरोधात कारवाईसाठी अद्याप कोणताही दबाव टाकलेला नाही. कौटुंबिक नाते तोडण्याची देखील भाषा केल्याने रोहिणी आचार्य यांनी आई-वडिलांना भावनिक संदेश दिला आहे.

Bihar news
Tamil Nadu Aircraft Crash : मोठी बातमी! भारतीय हवाई दलाचे विमान तामिळनाडूत कोसळलं

रोहिणी यांनी आरोप केला की, संयय यादव आणि रमीज यांच्या दबावामुळे निर्णय घ्यावा लागला आहे. रोहिणी यांच्या पोस्टमुळे आरजेडीच्या भविष्यातील वाटचालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरजेडीला २५ जागा मिळणे हे फक्त राजकीय अपयश नसून कौटुंबिक वाद आणि संघटनात्मक कमकुवतपणा असल्याचं बोललं जात आहे. तिकीट वाटपावरूनही राष्ट्रीय जनता दलात वादविवाद पाहायला मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com