

भारतीय वायूसेनेच्या विमानाताचा अपघात
भारतीय वायुसेनेचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं
अपघातात पायलट सुरक्षित
तामिळनाडूच्या तंबरममध्ये शुक्रवारी दुपारी २ वाजता भारतीय वायुसेनेचं प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणादरम्यान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलट सुरक्षित आहे. या अपघातानंतर वायुसेनेने चौकशीचे आदेश दिले आहेत.
भारतीय हवाई दलाचे विमान प्रशिक्षणार्थी विमान हे उपल्लम येथील जमिनीवर कोसळलं. अपघातादरम्यान पायलटने स्वत: उडी मारली. ही दुर्घटना दुपारी २.५० वाजता घडली. हे सिंगल ट्रेनर एअरक्राफ्ट होतं. पायलटने उडी मारत स्वत: चा जीव वाचवला. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मतदीसाठी धाव घेतली. दुर्घटनेनंतर ३० मिनिटानंतर आयएएफचं हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर पायलटला घेऊन गेले.
भारतीय वायूसेनेकडून अपघातानंतर अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रशिक्षाणार्थी विमान हे पीसी-७, पिलेटस रुटीन ट्रेनिंग मिशन होते. या ट्रेनिंगदरम्यान चेन्नईच्या तंबारामजवळ विमान कोसळलं. पायलट एअरक्राफ्टने दुर्घटनेवेळी उडी मारली. या घटनेनंतर भारतीय वायूसेनेने कोर्ट ऑफ इंक्वॉयरीचे आदेश दिले आहेत.
प्रशिक्षाणार्थी विमान हे पिलेटस पीसी -७ स्वीस कंपनीचं आहे. भारतीय वायूसेनेकडून हे २००५ सालापासून वापरण्यात येत आहे. हे विमान स्वस्त आणि सुरक्षित मानलं जातं. नौसेना आणि सेन्य दल देखील या विमानाचा वापर करते. मागील काही वर्षांत विमानाच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. २०२३ साली तेलंगणामध्ये झालेल्या एका विमान अपघातात दोन पायलट शहीद झाले होते.
पीलेटस पीसी-७ प्रशिणार्थी विमान
प्रशिणार्थी विमानात दोन पायलट बसू शकतात. या विमानात प्रशिक्षक आणि प्रशिणार्थी पायलट बसू शकतात. विमानाची लांबी ही ३२.१ फूट इतकी आहे. २७०० किलो वजन घेऊन विमान उड्डाण घेऊ शकते. या विमानात ४७४ लिटर इंधन असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.