कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

kalyan NICU : कल्याणमधील माता आणि नवजात बालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागात सुसज्ज NICU होणार आहे.
kalyan News
kalyan NICU Saam tv
Published On
Summary

कल्याणकरांना मोठा दिलासा

कल्याणमधील मातांना आणि नवजात बाळांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार

वसंत व्हॅली प्रसूतीगृहात सुसज्ज नवजात अतिदक्षता विभाग NICU लवकरच

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरातील मातांना आणि नवजात बाळांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलं आहे. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली प्रसूतीगृहात सुसज्ज नवजात अतिदक्षता विभाग NICU लवकरच सुरू होणार आहे. या उपक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख अमित संभाजी कोळेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश मिळालं आहे.

दोन महिन्यांपूर्वी या प्रसूतीगृहात एक नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या बालकाच्या पालकांनी NICU सुविधा नसल्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत पालिका प्रशासनाला जबाबदार धरले होते. या घटनेनंतर अमित कोळेकर यांनी पालिका आरोग्य विभागाकडे तातडीने NICU सुरू करण्याची मागणी केली होती.

kalyan News
प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू; मनोरंजन सृष्टीत खळबळ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आता अधिकृत पत्राद्वारे कळवले आहे की, वसंत व्हॅली प्रसूतीगृह बाह्यसंस्थेमार्फत १० वर्षांसाठी चालविण्यासाठी फेरनिविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये ५० जनरल बेड, ५ अतिदक्षता विभाग (ICU) बेड आणि १० बेडचा नवजात अतिदक्षता विभाग (NICU) समाविष्ट करण्यात आला आहे.

kalyan News
Maharashtra Politics : महायुती फिस्कटली, पण नवीच आघाडी उदयास आली; बदलापूरचं राजकारण फिरलं

पालिका आरोग्य विभागाने माहिती दिली आहे की, सुसज्ज NICU विभाग लवकरच सुरू करण्यात येईल, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. विशेषतः नवजात शिशूंच्या उपचारांसाठी स्थानिक स्तरावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

kalyan News
Maharashtra Politics : रुपाली ठोंबरे पाटील यांनी दंड थोपटले, मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; फेसबुक पोस्ट चर्चेत

या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे कल्याण ग्रामीण शहरप्रमुख अमित संभाजी कोळेकर म्हणाले,कल्याणमधील पालिका रुग्णालयांमध्ये आजपर्यंत NICU सुविधा नव्हती. गरीब आणि गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयातील NICU चा खर्च परवडत नाही. आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही सुविधा सुरू होणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे. प्रशासनाने हा विभाग लवकरात लवकर कार्यान्वित करून जनतेच्या सेवेत दाखल करावा. या निर्णयामुळे कल्याणमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मातांना आणि नवजात बाळांना आता त्यांच्या शहरातच दर्जेदार उपचार सुविधा मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com