प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू; मनोरंजन सृष्टीत खळबळ

model Khushboo Ahirwar suspicious death in Bhopal : मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध मॉडेलचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे .
Khushboo Ahirwar News
Khushboo AhirwarSaam tv
Published On
Summary

मॉडेल खुशबू अहिरवार हिचा संशयास्पद मृत्यू

खुशबूच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का

मॉडेलच्या कुटुंबीयाचा तिच्या बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

मध्य प्रदेशची राजधानी भोपालमधील मॉडेल खुशबू अहिरवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचे कुटुंबीय प्रेमाने खुशी म्हणायचे. खुशबूच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. खुशबूचा रविवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाला. तिच्या मृत्यूवरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. खुशबूच्या आईने प्रियकर कासिम अहमदवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे.

मॉडेल खुशबूच्या आईच्या म्हणण्यानुसार, कासिम अहमदने रात्री ११ वाजता आम्हाला फोन केला. त्याने खुशबूची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने भोपाळमधील चिरायु रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर खुशबूला मृत घोषित केलं. तिच्या कुटुंबीयांनी खुशबूचा मृतदेह बघितला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर शरीरावर जखमा होत्या. तिचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून तिची हत्या झाल्याचा कुटुंबीयाचा आरोप आहे. यावेळी कुटुंबीयांनी लव्ह जिहादचाही आरोप बॉयफ्रेंडवर केला.

Khushboo Ahirwar News
हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

पोलिसांच्या माहितीनुसार, खुशबूचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण समोर येईल. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कासिम अहमद याचं आधी देखील काही गुन्ह्यात नाव समोर आलं. बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगून आला आहे.

Khushboo Ahirwar News
Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

पोलिसांच्या माहितीनुसार, खुशबू आणि कासिम उज्जैनहून भोपाळ येथे परतत होते. बैरागढजवळ आल्यानंतर खुशबूची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर तिला कासिमने चिरायू रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी खुशबूला मृत घोषित केले.

Khushboo Ahirwar News
Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पोलीस अधिकारी दिव्या झारिया यांनी सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात प्राथमिक तपास सुरु केला आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे. फॉरेन्सिक टीमला आवश्यक पुरावे गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com