

एकाच वेळी चार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे लोकार्पण
एर्नाकुलम–बेंगळुरु ट्रेन दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांना जोडणार
वंदे भारत ही आठ कोचची सेमी हाय-स्पीड प्रीमियम सेवा असून आठवड्यात सहा दिवस धावणार आहे
New Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस रेल्वे स्टेशनवरून चार नव्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. नव्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन या Banaras-Khajuraho, Lucknow-Saharanpur, Firozpur-Delhi आणि Ernakulam-Bengaluru या मार्गावरून धावणार आहेत.
Ernakulam हून KSR Bengaluru पर्यंत धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचं लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलं. या ट्रेनमुळे दक्षिण भारताला इंटर-स्टेट सेमी हाय-स्पीड प्रिमियम सेवा मिळणार आहे. ही ट्रेन केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाला जोडणार आहे. दक्षिणेतील या रेल्वेमुळे व्यापार, पर्यटन आणि शिक्षणाला चालना मिळणार आहे.
आठ कोच असणारी वंदे भारत ट्रेन Thrissur, Palakkad, Coimbatore, Tiruppur, Erode आणि Salem या प्रमुख शहरातून धावणार आहे. तसेच Krishnarajapuram व्हाया केएसआर बेंगळुरु येथे पोहोचणार आहे. केरळहून धावणारी तिसरी वंदे भारत ही तीन राज्यांना जोडणार आहे.
एर्नाकुलमहून बेंगळुरुहून जाणाऱ्या इंटरसिटी ट्रेनला ५८३ किलोमीटर पूर्ण करण्यासाठी ११ तास लागतात. परंतु वंदे भारत ट्रेनने हा प्रवास अवघ्या ८ तास ४० मिनिटात पूर्ण होईल. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी वंदे भारत ट्रेन नियमितपणे सुरु होईल. बेंगळुरुहून सकाळी ५ वाजून १० वाजता निघाल्यानंतर ट्रेन ही दुपारी १.५० वाजता एर्नाकुलम येथे पोहोचेल. त्यानंतर दुपारी एर्नाकुलम येथून दुपारी २.२० वाजता निघाल्यानंतर रात्री ११ वाजता बेंगळुरु येथे पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यात सहा दिवस चालेल. वंदे भारतची ही ट्रेन बुधवारी बंद राहील.
ट्रेनमध्ये जीपीएस आधारित इंफोटेनमेंट सिस्टम, बायो-वॅक्यूम टॉयलेट, ऑटोमॅटिक दरवाजे, एर्गोनोमिक सिटिंग, रिडिंग लाइट आणि वाय-फायची सुविधा उपलब्ध असणार आहे. देशभरात आतापर्यंत १६४ हून अधिक वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.