

बदलापुरात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार, असे बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितलं
‘25 ते 30 उमेदवार ठरले, उद्या चित्र स्पष्ट होणार, असे खासदार म्हात्रे म्हणाले.
दोघांच्या भांडणात आमचाच लाभ - सुरेश म्हात्रे
मयुरेश कडव, साम टीव्ही
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढेल, आमचे 25 ते 30 उमेदवार ठरले असून उद्याच अंतिम चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली. नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचा असेल असंही त्यांनी सांगितलंय. बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज बदलापूरचा दौरा केला. तसंच निवडणूक तयारीचा आढावाही घेतला.
राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप सत्तेत आहेत. मात्र बदलापुरात सत्ताधाऱ्यांमध्ये भांडणं सुरू असल्याचं सांगत या दोघांच्या भांडणाचा लाभ तिसऱ्याला म्हणजेच महाविकास आघाडीला होईल, असा विश्वासही यावेळी बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केलाय.
बदलापूरच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने सामने ठाकलेत. युती होण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. हीच संधी साधत महाविकास आघाडीनं मनसेला सोबत घेत पहिला मास्टर स्ट्रोक मारलाय. अर्थात महाविकास आघाडीची ही एकी शेवटपर्यंत टिकणार का? की बाळ्यामामा म्हणतात तसं महायुतीतल्या भांडणाचा लाभ आघाडीचा होणार? हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.
तत्पूर्वी, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची २०१५ च्या निडवडणुकीनंतर पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत २४ पॅनल असणार आहे. त्यांना एकूण ४९ नगरसेवक निवडून आणायचे आहेत. २३ पॅनल द्विसदस्यीय असणार आहे. तर एक पॅनल त्रिसदस्यीय असून नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे.
नगराध्यक्षपदाची निवड जनतेतून थेट होणार आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी (शिंदे गट) प्रतिष्ठेची असणार आहे. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेवर २०१५ मध्ये ४७ प्रभागांपैकी शिवसेना २४, भाजप २०, राष्ट्रवादी २, अपक्ष १ असे असे पक्षीय बलाबल पाहायला मिळाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.