महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Mahayuti Politics : तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. सावंत यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे.
Mahayuti Politics
Maharashtra politics Saam tv
Published On
Summary

तानाजी सावंत यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका

सावंतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाकडून पलटवार

रोहन सुरवसे पाटील यांच्याकडून सावंत यांना जबाबदारीने बोलण्याचा स

महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आलाय

सागर आव्हाड, साम टीव्ही

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. धाराशिव येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलताना, “राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसा तडफडतो, तशी राष्ट्रवादीची अस्वस्था आहे” अशी टीका आमदार तानाजी सावंत यांनी केली. यावरून महायुतीत नवा वाद रंगला आहे. तानाजी सावंत यांच्या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केला आहे.

Mahayuti Politics
मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

आमदार तानाजी सावंत मंत्रिपद नसल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युतीधर्माबद्दल उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा एक डोस स्वतः प्यावा म्हणजे युती धर्मात मिठाचा खडा पडणार नाही, असा टीकात्मक खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी सावंतांना दिला आहे.

Mahayuti Politics
Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं मंत्रिपद का काढून घेतलं? याच आत्मचिंतन सावंत यांनी करावं. महायुतीत एकत्र असताना महायुतीचे संस्कार पाळायचे नाही, मित्रपक्षावर पातळी सोडून टीका करत रहायची अशा कारणामुळेच त्यांना मंत्रिपद नाही. हे त्यांना अजून समजत नसेल तर मग अवघड आहे. महायुतीत असतानाही मित्रपक्षावर टीका केल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण तयार होत आहे.

Mahayuti Politics
6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

तानाजी सावंत यांनी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना भान ठेवून आणि जबाबदारीने बोलावे अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. जशास तसं प्रत्युत्तर देताना संकोच बाळगला जाणार नाही असा इशाराही सुरवसे-पाटील यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com