Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये 'दिल्ली' पॅटर्न, हायकोर्टाजवळ कारमध्ये स्फोट; मृतांचा आकडा वाढला

Pakistan Blast update : पाकिस्तानमध्ये दिल्ली पॅटर्न स्फोट झाला. इस्लामाबादमधील हायकोर्टाजवळ कारमध्ये स्फोट झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला.
Pakistan Blast
Pakistan Blast news Saam tv
Published On
Summary

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील हायकोर्टाजवळ कारमध्ये भीषण स्फोट

या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

कारमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर पाकिस्तानातही अशीच घटना

दिल्लीनंतर आता पाकिस्तानही स्फोटाने हादरला आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील हायकोर्टाजवळ कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर दिल्लीत सायंकाळी झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा पाकिस्तान स्फोटाने हादरलं आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील हायकोर्टाजवळील एका कारमध्ये स्फोट झाला. कारमधील सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर हायकोर्ट परिसरात एकच धावाधाव झाली. या स्फोटात सुरुवातीला ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली होती. आता स्फोटातील मृतांचा आकडा वाढून १२ पर्यंत पोहोचला आहे.

Pakistan Blast
Pune Accident : पुण्यात अपघाताचा थरार; कारने अनेक वाहनांना उडवलं, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

पाकिस्तानातील हा स्फोट आज मंगळवारी दुपारी १२.३० वाजता झला. वर्दळीच्या ठिकाणी हा स्फोट झाला. या स्फोटात एक वकील देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, कारमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटाची प्रत्येक बाजूने तपास केला जात आहे. पाकिस्तानातील वाढत्या स्फोटाच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Pakistan Blast
Mumbai Politics : मुंबईत मतदारांची नावे गुजराती, बंगाली आणि तामिळ भाषेत; मराठीला डावलल्याने मनसे आक्रमक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकवर कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकराणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

Q

पाकिस्तानमधील स्फोट नेमका कुठे झाला?

A

पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील हायकोर्टाजवळ कारमध्ये भीषण स्फोट झालाय.

Q

स्फोटात किती लोकांचा मृत्यू झाला?

A

 आतापर्यंत स्फोटात १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com