Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO
एकमेकांवर टोकाची टीका करणारे मुंडे भाऊ-बहीण आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत एकत्र आले.. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार की नाही? अशी चर्चा रंगली होती... मात्र या चर्चेवर अखेर पडदा पडलाय..कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तब्बल 15 वर्षानंतर परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकत्र येतायेत..
दुसरीकडे भाजपने मात्र परळीतील युतीचा निर्णय पंकजा मुंडेंच्या कोर्टात टाकलाय..खरंतर परळी नगरपरिषदेवर धनंजय मुंडेंचं एकहाती वर्चस्व आहे... त्यातच 2011 मध्येही धनंजय मुंडेंनी थेट गोपिनाथ मुंडेंना आव्हान देत परळी नगरपरिषदेत बंडखोरी केली होती.. तर 2016 मध्येही परळी नगरपरिषदेवर धनंजय मुंडेंचाच वरचष्मा होता... मात्र एकूण संख्याबळ नेमकं कसं होतं? पाहूयात...
परळी नगरपरिषदेत एकूण 35 जागांपैकी धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने 28 जागा जिंकल्या होत्या.. तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजपला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र आता परळीत राजकीय आणि कौटुंबिक समीकरण बदललंय... पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे कटुता विसरुन एकत्र आलेत... त्यामुळे मुंडे बहीण भावाच्या युतीचा नवा फॉर्म्युला समोर आलाय..
हा फॉर्म्युला नेमका काय आहे? पाहूयात...
परळीच्या एकूण 35 जागांपैकी भाजप 12 ते 15 जागा तर राष्ट्रवादी 20 ते 23 जागांवर लढण्याची शक्यता आहे...
मुंडे भाऊ बहीण लोकसभा निवडणुकीतच एकत्र आले होते... मात्र त्यावेळी जरांगे फॅक्टरमुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता नगरपरिषद निवडणुकीच्या आधी मनोज जरांगेंनी थेट धनंजय मुंडेंवर हत्येच्या कटाचा आरोप केलाय. त्यामुळे मुंडे विरुद्ध जरांगे राजकारण तापलंय. त्यामुळे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतरही जरांगे फॅक्टरमुळे मुंडेंना परळीची नगरपरिषद राखणं शक्य होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
