Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Local Body Election update : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणता वॉर्ड कोणासाठी राखीव आहे.
Local Body Election update
election Saam Tv
Published On
Summary

मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर

वीस प्रभाग आणि 78 वॉर्डसाठी काढण्यात आली आरक्षण सोडत

अनुसूचित जमातीसाठी एकच जागा आरक्षित

सांगली-मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज प्रभाग निहाय आरक्षण सोडत संपन्न झाल्या. एकूण वीस प्रभाग आणि 78 वॉर्डसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आलीये. महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या नियंत्रणाखाली ही आरक्षण सोडत संपन्न झाली.

आरक्षण सोडतीमध्ये 78 वॉर्डापैकी अनुसूचित जातीसाठी 11 जागा राखीव ठेवण्यात आल्यात. त्याच्यापैकी ६ जागा त्या प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी एक जागा यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. मात्र यावेळी अनुसूचित जमाती महिलासाठी कुठल्याही जागा आरक्षित करण्यात आली नाहीये.

Local Body Election update
Pune Police : पुण्याच्या कोथरुडममधील मुलींना मारहाण करणं भोवलं? पोलीस निरीक्षकांसह ७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 21 जागा आरक्षित ठेवण्यात आल्यात. त्याच्यापैकी 11 जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबतच सर्वसाधारण जागाची संख्या एकूण 45 आहे आणि त्याच्यापैकी 22 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

Local Body Election update
कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

अमरावती महापालिकेच्या ४४ जागा महिलांसाठी

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 21 प्रभागातील प्रत्येकी चार जागांचे तर १ प्रभागातील तीन जागांचे आरक्षण महापालिका आयुक्त सोम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. या आरक्षणाने काही सुखावले तर काही दुखावले आहे.

एकूण 22 प्रभागातल्या 87 जागांपैकी अनुसूचित जाती15, जमाती 2, नागरिकाच्या मागास प्रवर्ग 23 तर उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. एकूण जागांपैकी 44 जागा सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. आरक्षण जाहीर होतात इच्छुकाची मोर्चेबांधणी जोरात सुरू झाली आहे, दि. 17 ते 24 नोव्हेंबर पर्यंत या आरक्षणावर हरकती सूचना मागवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com