Mumbai : मुंबईतील चारकोप बिहार होतोय, गोळीबाराच्या घटनेत वाढ; मनसेचा थेट पोलिसांना इशारा, म्हणाले...

Mumbai crime : चारकोपचा बिहार होत आहे. गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली आहे. यावरून मनसेने थेट पोलिसांना इशारा दिला आहे.
mumbai news
Mumbai Saam tv
Published On
Summary

मुंबईत गोळीबाराच्या घटनेत वाढ

दोघांकडून चारकोपमध्ये बिल्डरवर गोळीबार

गोळीबाराच्या घटनेवरुन मनसे आक्रमक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या चारकोपमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. दोघांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर फेड्री जखमी झाले आहेत. त्यांना तातडीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. चारकोपमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कांदिवलीच्या चारकोप परिसरात गेल्या काही महिन्यांत गोळीबाराच्या घटना सतत वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. परिसरात दर दहा घरात तपासणी केल्यास एक गावठी कट्टा सापडेल. एवढ्या प्रमाणात अवैध शस्त्रांचा पुरवठा वाढला आहे,असा आरोप मनसेने केला आहे.

नवरात्रीत जनकल्याण नगरमध्ये झालेल्या गोळीबारात यादव नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शेखर नावाच्या एका व्यक्तीवर गोळीबार होऊन त्याचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. याआधी चव्हाण–यादव गटातील वादातूनही गोळीबाराची घटना घडली होती. या सर्व वाढत्या घटनांमुळे चारकोप परिसरातील लोकांमध्ये भीतीचे सावट गडद झालं आहे.

mumbai news
Kalyan : कल्याणचा स्कायवॉक फेरीवाल्यांनी गिळला; प्रशासन मूग गिळून गप्प, कारवाई करणार की नाही?

चारकोपमधील वाढत्या गुन्हेगारीला मनसेने कडक शब्दांत विरोध दर्शवला आहे.'चारकोपला बिहार बनवण्याचा डाव सुरू आहे. पोलिसांनी तात्काळ घरांची तपासणी करावी, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांचे रक्षण करू, असा गंभीर इशारा मनसे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिला आहे.

mumbai news
Ajit Pawar : अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; थेट उपमुख्यमंत्र्यांना वशीकरण करण्याचा प्रयत्न? चर्चेला उधाण

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी तातडीने पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. चारकोपमधील वाढत्या गोळीबाराच्या घटनेमुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांच्या हालचालींना गती मिळते का, असा प्रश्न उपस्थित झालाय. तर वाढत्या शस्त्रसाठ्यांवर नियंत्रण येते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com