गेस्ट हाऊसमध्ये पाच जणांचे मृतदेह आढळले
पाचही जण एकाच कुटुंबातील होते
सर्वांनी गळफास घेत आयुष्य संवपलं
त्यांनी ३ दिवसांपूर्वी केली होती आत्महत्या
आंध्र प्रदेशमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आंध्र प्रदेशच्या श्रीशैलम शहरातील एका रेस्ट हाऊसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत या पाचही जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पाचही जणांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या रेस्ट हाऊसमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गेस्ट हाऊसच्या एका खोलीमध्ये दोन पुरूष आणि तीन महिलांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिस या सामूहिक आत्महत्येमागचे कारण शोधत आहेत.
'वडेरा सतारम' या गेस्ट हाऊसमधील एका खोलीमधील पंख्याला दोन पुरूष गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तर बाथरुममध्ये ३ महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या पाच जणांनी तीन दिवस आधीच आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मंगळवारी मिळाली जेव्हा बंद खोलीतून दुर्गंधी येत होती. कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
पल्लापु सुधाकर (५० वर्षे), गोगुला आदिलक्ष्मी (३६ वर्षे) मल्लेश्वरी (४५ वर्षे), श्रीदेवी (३३ वर्षे) आणि मणिकंठा (१५ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्यांची नाव आहेत. मणिकंठा हा मल्लेश्वरीचा मुलगा होता. हे सर्व कुटुंबीय श्री सत्य साई जिल्ह्यातील बित्तलापल्ली येथे राहणारे होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुधाकरण, त्याच्या ३ बहिणी आणि भाचा हे गेल्या महिन्यात श्रीशैलमला येथे राहायला आले होते. ते गेल्या महिनाभरापासून या खोलीत राहत होते. या खोलीचे ते दररोज २९ रुपये भाडे देत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.