Pati Patni Aur Panga 2 Set Fire: 'पती पत्नी और पंगा २'च्या सेटवर भीषण आग; 'हसल ५'चाही सेटही आगीच्या विळख्यात

Pati Patni Aur Panga 2 Set Fire: ‘पती पत्नी और पंगा २’च्या गोरेगावमधील सेटवर भीषण आग लागली. आग ‘हसल ५’च्या सेटपर्यंत पोहोचली. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Pati Patni Aur Panga 2 Set Fire
Pati Patni Aur Panga 2 Set FireSaam Tv
Published On: 

Pati Patni Aur Panga 2 Set Fire: ‘पती पत्नी और पंगा’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शोमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकप्रिय कपल सहभागी होणार असून, त्यांच्या केमिस्ट्री आणि नात्याची परीक्षा घेतली जाणार आहे. शोचे प्रोमो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, शोच्या प्रीमियरपूर्वीच सेटवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील गोरेगाव परिसरातील प्राइम फोकस स्टुडिओमध्ये ‘पती पत्नी और पंगा २’चे शूटिंग सुरू होते. याच ठिकाणी अचानक भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Pati Patni Aur Panga 2 Set Fire
Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

‘हसल ५’च्या सेटपर्यंत पोहोचली आग

मिळालेल्या माहितीनुसार, ‘पती पत्नी और पंगा २’च्या सेटवर लागलेली आग शेजारील ‘हसल ५’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटपर्यंतही पोहोचली. ‘हसल ५’ हा रॅपर बादशाहचा लोकप्रिय शो आहे. त्यामुळे एकाच स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या दोन रिअ‍ॅलिटी शोच्या सेटला आगीचा फटका बसल्याचे समोर आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. शोचे कलाकार सेटवरील कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

Pati Patni Aur Panga 2 Set Fire
Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच आगीत किती नुकसान झाले, याबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. शोच्या निर्मात्यांकडून या घटनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

‘पती पत्नी और पंगा २’मध्ये दिसणार 'हे' कलाकार

दरम्यान, ‘पती पत्नी और पंगा २’मध्ये यावेळी अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकार सहभागी होणार आहेत. अर्चना पूरन सिंग आणि परमीत सेठी, दीपिका सिंग आणि रोहित राज गोयल, दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया, अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी, दिशा परमार आणि राहुल वैद्य तसेच शब्बीर अहलुवालिया आणि कांची कौल या जोड्या शोमध्ये दिसणार आहेत. ‘पती पत्नी और पंगा २’चा प्रीमियर १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा शो कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com