Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Shruti Vilas Kadam

शिमरी गाऊनचा ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री वैदेही परशुरामीने हलक्या बेज आणि सिल्व्हर टोनचा सुंदर शिमरी गाऊन परिधान केला आहे. संपूर्ण गाऊनवर केलेले बारीक चमकदार वर्क तिच्या लूकला ग्लॅमरस टच देत आहे.

Vaidehi Parshurami

बॉडी-हगिंग फिट

या गाऊनचा फिट बॉडी-हगिंग असून त्यातून अभिनेत्रीचा एलिगंट सिल्हूट उठून दिसत आहे. कमरेपासून खाली जाणारा फ्लोईंग कट लूकला अधिक आकर्षक बनवत आहे.

Vaidehi Parshurami

नाजूक स्लीव्ह्जची खासियत

गाऊनला फुल किंवा थ्री-फोर्थपेक्षा वेगळ्या पद्धतीच्या नाजूक, पारदर्शक स्लीव्ह्ज देण्यात आल्या आहेत. त्यावर असलेले उभे शिमरी डिझाइन लूकमध्ये स्टाइल वाढवत आहे.

Vaidehi Parshurami

मिनिमल ज्वेलरी

या ग्लॅमरस आउटफिटसोबत अभिनेत्रीने अतिशय कमी आणि नाजूक दागिने कॅरी केले आहेत. त्यामुळे गाऊनचा शिमरी इफेक्ट उठून दिसतो आणि लूक ओव्हर न वाटता सोबर राहतो.

Vaidehi Parshurami

नो मेकअप लूक

अभिनेत्रीचा मेकअप ग्लॅमरस आउटफिटला साजेसा पण नैसर्गिक ठेवण्यात आला आहे. न्यूड टोन, हलकी आय मेकअप आणि सॉफ्ट लिप शेडमुळे तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसत आहे.

Vaidehi Parshurami

साइड-पार्टेड हेअरस्टाइल

वैदेहीने केस साइड-पार्ट करून एका बाजूला मोकळे सोडले आहेत. हलक्या वेव्ह्जसह केलेली ही हेअरस्टाइल तिच्या वेस्टर्न लूकला आकर्षक आणि मॉडर्न टच देत आहे.

Vaidehi Parshurami

समुद्रकिनाऱ्याची सुंदर पार्श्वभूमी

या फोटोची आणखी एक खासियत म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड. निळेशार समुद्र, स्वच्छ आकाश, पांढरे ढग आणि लाकडी जेट्टीवरची रोप-बॅरियर. निळ्या समुद्राच्या बॅकग्राऊंडमध्ये शिमरी बेज गाऊनचा रंग अधिक खुलून दिसतो.

Vaidehi Parshurami

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

Migraine Home Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा